मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय...फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचा मोठा दावा करण्यात आलाय. हो तुम्ही ऐकलं ते खरंय..... फडणवीसांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय. त्यामुळे मोठी खळबळ उडालीय.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार की काय अशी शक्यता वर्तवली जातेय. त्याला कारणही तसंच आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मतोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे भेट घेतल्याचा खळबळजनक दावा केला जातोय. वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी 'एक्स'वर व्हिडिओ शेअर करत याबाबत दावा केलाय. .
25 जुलै रोजी संजय राऊत भाजप अध्यक्ष नड्डांना भेटले. 5 ऑगस्ट रोजी देवेंद्र फडणवीस मातोश्री बंगल्यावर आले. फडणवीस स्वतः मातोश्रीवर गाडी चालवत आले होते. 2 तास फडणवीसांची ठाकरेंसोबत चर्चा झाली. 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. तर याबाबत संजय राऊतांनी कोण सिद्धार्थ मोकळे म्हणत याबाबत अधिक भाष्य मात्र टाळलंय..
लोकसभा निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत प्रवेश करण्यासाठी बोलणी सुरु केली होती. ठाकरे गटासोबत वंचितची आघाडी पुढच्या टप्प्यांवरही गेली. मात्र जागावाटपावरुन बोलणी फिस्कटली आणि दोघांची फाटाफूट झाली. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी वंचितची ही खेळी तर नाही न असा सवाल उपस्थित होतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.