Akola Politics : मनपाची खासगी कर वसुली बंद करा; अकोल्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Akola Political News in Marathi : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने मनपाची खासगी टॅक्स वसुली बंद करा, असा नारा देत आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली.
Akola Politics
Akola PoliticsSaam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला

Akola Political News :

अकोल्यात खासगी कंपनीमार्फत केली जाणारी कर वसुली लुट थांबवण्यात यावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने मनपाची खासगी टॅक्स वसुली बंद करा, असा नारा देत आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. (Latest Marathi News)

कर वसुलीविरोधात अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे स्वत: स्त्यावर उतरले. यावेळी रस्त्यावर उभे राहून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी अंजली आंबेडकर म्हणाल्या, वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण शहरात आंदोलन केलं होतं. स्वाक्षरीची मोहीम केली होती. अकोला महानगर पालिकेच्या कर वसुलीचं कंत्राट हे स्वाती इंडस्ट्रीजला दिलं, ते रद्द करावं. त्यात अनेक अनियमितता होती. हे १५०० कोटी रुपयांचं कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आलं.

Akola Politics
Sindhudurg Ratnagiri Election: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सुटला; उमेदवार कोण असणार? देवेंद्र फडणवीसांनी सर्वकाही सांगितलं

'पालिकेची मुदत संपलेली असताना कंत्राट देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या कंपनीकडून नागरिकांना धमकावण्याचे काम सुरु होतं. यासंबंधित अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे अभय योजना लागू करण्याची मागणी केली होती. याबाबत महापालिका निर्णय घेणार आहे, असेही त्या म्हणाले.

Akola Politics
Maharashtra Lok Sabha Election : नाशिकमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे सामना रंगणार? कोण असणार उमेदवार? जाणून घ्या

वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या काय?

दरम्यान, अकोला महापालिकेच्या कर वसुलीचे काम स्वाती इंडस्ट्रीजला का? त्याला भाजपाचा विरोध का नाही? नागारिकांनी महापालिकेत शंभर रुपये भरल्यानंतर त्यापैकी आठ रुपये ३९ पैसे कंत्राटदाराच्या खिशात का घालत आहेत? पालिकेचा ५० टक्के कर अकोलेकर नागरिक स्वतः भरत होते. मग त्यांना थेट टॅक्समध्ये ८ टक्के सूट का नाही? महापालिकेत शंभर रुपये भरणाऱ्या अकोलेकरांना थेट आठ रुपये सूट का दिली नाही? स्वाती इंडस्ट्रीजला कर वसुलीचा ठेका देताना भाजपचे कोणते नेते त्यात लाभार्थी आहेत, थेट पार्टनर आहेत का? याचा खुलासा भाजप नेत्यांनी केला पाहिजे, अशी मागणी वंचितनं केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com