Sindhudurg Ratnagiri Election: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सुटला; उमेदवार कोण असणार? देवेंद्र फडणवीसांनी सर्वकाही सांगितलं

Maharashtra Lok Sabha Election 2024 | Devendra Fadnavis on Sindhudurg Ratnagiri Candidate: महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis Talked on Sindhudurg Ratnagiri Lok Sabha Election 2024 Constituency Candidate
Devendra Fadnavis Talked on Sindhudurg Ratnagiri Lok Sabha Election 2024 Constituency CandidateSaam Tv

Devendra Fadnavis Latest News :

भाजपने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने काल राज्यातील २० उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपकडून अद्याप काही जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेले नाहीत. महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते. रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन इमारतीचं भूमीपूजन करणार आहे. त्यानंतर पोलिस वसाहतीच्या नवीन इमारतीचे भुमिपूजन आणि पोलीस विभागाला वाहनांचे वाटप कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर ऐतिहासिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कारागृहाला देखील भेट घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर मोठं भाष्य केलं.

Devendra Fadnavis Talked on Sindhudurg Ratnagiri Lok Sabha Election 2024 Constituency Candidate
Vasant More Meet Sharad Pawar : वसंत मोरेंचं ठरलं? शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात पोहोचले, प्रतिक्रियाही दिली

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. या मतदारसंघात महायुतीच लढणार आहे. तिथे महायुतीचा उमेदवार जिंकून येणार आहे. त्याचं चिन्हही महायुतीचं असेल'.

Devendra Fadnavis Talked on Sindhudurg Ratnagiri Lok Sabha Election 2024 Constituency Candidate
Beed Politics : 2019 च्या निवडणुकीत पराभूत करणारे धनंजय मुंडे यंदा पंकजा मुंडेंसाठीच लढणार; 5 वर्षांत कसं बदललं बीडचं राजकारण?

रत्नागिरीतील विकासकामाविषयी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

'नवीन पोलीस निवासस्थाने करत आहोत. नवी जिल्हाधिकारी कार्यालय करत आहोत. ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दोन वर्ष ज्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. ते फार जुन झालं आहे. त्याचं मजबुतीकरण जी कोठडी आहे, तिथे अनेक जण प्रेरणा घेण्यासाठी येतात. तिथे देखील सुशोभिकरण करायचं आहे. इतिहासाचं जतन करण्यास आम्ही सुरुवात केली आहे. आजचा कार्यक्रम फार प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघासाठी महायुतीतील कोणत्या पक्षाला ही जागा मिळणार आणि उमेदवार कोण असणार याबाबतीत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com