Vasant More Meet Sharad Pawar: वसंत मोरेंचं ठरलं? शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात पोहोचले, प्रतिक्रियाही दिली

Vasant More on Joining NCP (National Cogress Party): वसंत मोरे यांनी आज दुपारी पुण्यातील शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. या भेटीवरून वसंत मोरे याचं ठरलं असून ते लवकरच त्यांचा निर्णय जाहीर करतील असं म्हटलं जातं आहे.
Vasant More
Vasant MoreSaam Tv

Vasant More Visited Sharad Pawar Group Office:

मनसेला रामराम ठोकल्यानंतर वसंत मोरे दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.आता या सस्पेन्सवरून लवकरच पडदा उठणार आहे. वसंत मोरे यांनी आज दुपारी पुण्यातील शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. त्यांच्या या भेटीने ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे.(Latest News)

आपल्याला शरद पवार साहेबांनी भेटायला बोलवलं होतं. त्यामुळे आपण येथे आलो असल्याचं मोरे म्हणाले. पण त्याचवेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही बोलून दाखवली. यामुळे जर त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल तर ते शरद पवार गटात प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आज पुन्हा त्यांनी शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात भेट दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vasant More
Vasant More Social Media Post: ग्रुपमधून काढलं पण पोरांच्या हृदयातून कसे काढणार..? वसंत मोरे यांची भावनिक पोस्ट

यावेळी पत्रकारांशी वसंत मोरे यांनी संवाद साधला. तुर्तास आपण पक्ष प्रवेश करत नसून ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं मोरे म्हणालेत. यामुळे त्यांची काय भूमिका आहे ही त्यांनी गुलदस्तात ठेवलीय. मिळालेल्या माहितीनुसार , वसंत मोरे हे शरद पवार यांची भेट घेतील त्यानंतर चर्चा होईल त्यानंतरच मोरे आपली भूमिका स्पष्ट करतील. 'मला साहेबांनी भेटायला बोलवलं होतं, त्यामुळे मी आलो. सध्या निवडणुका आहेत मी खासदारकीसाठी इच्छुक आहे. परंतु आज माझा पक्षप्रवेश नाहीये. आज मी फक्त शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलोय'.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वसंत मोरे यांची ओळख कट्टर मनसैनिक म्हणून होती. परंतु बऱ्याच दिवसांपासून ते पक्षात नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडत पक्षाला रामराम ठोकला. वसंत मोरे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आज पुन्हा त्यांनी शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात भेट दिली. यावेळी पत्रकारांशी वसंत मोरे यांनी संवाद साधला.

तुर्तास आपण पक्ष प्रवेश करत नसून ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं मोरे म्हणालेत. यामुळे त्यांची काय भूमिका आहे ही त्यांनी गुलदस्तात ठेवलीय. मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे हे शरद पवार यांची भेट घेतील त्यानंतर चर्चा होईल त्यानंतरच मोरे आपली भूमिका स्पष्ट करतील. 'मला साहेबांनी भेटायला बोलवलं होतं, त्यामुळे मी आलो. सध्या निवडणुका आहेत मी खासदारकीसाठी इच्छुक आहे. परंतु आज माझा पक्षप्रवेश नाहीये. आज मी फक्त शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलोय'.

शरद पवारांची मी भेट घेतली लोकसभेसाठी मी एक वर्षापासून इच्छुक आहे. महाविकास आघाडीने संधी दिली तर कासब्याची पुनरावृत्ती करून दाखवेल. हे सांगायला मी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांना काही गोष्टी मी लिहून दिले आहेत.' मला आजची वेळ सुप्रियाताई यांनी घेऊन दिली होती. माझ्या उमेदवारीचा फायदा शिरूर आणि बारामती मध्ये कसा होऊ शकतो हे 2019 मध्ये ही माहित होतं. बारामती शिरूर आणि पुणे हा जर त्रिकोण पूर्ण झाला तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे प्रभुत्व येऊ शकतं या गोष्टी मी अमोल कोल्ह्यांना सांगितल्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com