Shiv Sena Dasara Melava: उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : दसरा मेळाव्याचं मैदान ठरलंय...आता फक्त आव्वाज घुमणाराय...आणि उत्सुकता आहे टीकेच्या बाणांची..वाचा यावरीलच हा एक स्पेशल रिपोर्ट.
उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam Tv
Published On

विचाराचं सोनं लुटण्यासाठी यंदा शिवसैनिक सज्ज झालेत. शिवसेना आणि दसरा यांचं अनेक दशकांपासूनचं नातं आहे. यंदा शिवाजीपार्कात ५८ वा दसरा मेळावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेचा तिसरा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानात होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा हे अनोखं समीकरण गेल्या अनेक दिवसांपासून उभ्या देशानं पाहीलं.

यंदा उद्धव ठाकरेंनी मागील घटनांमधून बोध घेत ८ महिन्यांपूर्वीच शिवाजी पार्कसाठी अर्ज करुन ठेवल्यानं त्यांना शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...
Uddhav Thackeray: 15 लाखाचे पंधराशे का केले? लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला घेरलं

तर शिंदे गटानं शिवाजी पार्कसाठी अर्जच न केल्यानं त्यांनी तिसरा दसरा मेळावा घेण्यासाठी आझाद मैदान आणि बीकेसी बुक करुन ठेवलं होतं. त्यामुळे यंदा शिंदे आपला तिसरा दसरा मेळावा हा आझाद मैदानात घेतील असं दिसतंय.

राज्यातील इतर दसरा मेळाव्यापैकी शिवसेनेचा दसरा मेळावा कायम लक्षवेधी ठरायचा. कारण या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते यायचेय.

उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना फक्त मत मिळवण्यासाठी नाही, विरोधकांवर मुख्यमंत्री शिंदे बरसले

परंतू 2022 ला शिवसेना फुटल्यानंतर दसरा मेळाव्याचंही विभाजन झालं. सध्याच्या राजकीय संघर्षात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले दसरा मेळावे महत्त्वाचे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मेळाव्यातून खरंच विचाराचं सोनं वाटण्यात येतं की, फक्त एकमेंकावर टिका टिप्पणी होते. हे पाहणं देखिल तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com