Uddhav Thackeray: 15 लाखाचे पंधराशे का केले? लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला घेरलं

Uddhav Thackeray On Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
15 लाखाचे पंधराशे का केले? लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला घेरलं
Uddhav Thackeray On Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

''आम्हाला फक्त पंधराशे रुपये देतात, असं बहिणींनी मला सांगितलं. 2014 पर्यंत आम्ही प्रचार करत फिरत होतो, पंधरा लाखाचे पंधराशे का केले? '', असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला विचारला आहे. आज नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्यात आलं. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ''मालावन मध्ये जे घडलं, ते लाजिरवाणी होते. नौदल सामर्थ्य दाखवताना पैसे खालले, पुतळा पडला.'' भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यावर टीका करत ते म्हणाले, ''आपल्याला भांडत ठेवायचे भाजपचं काम आहे, विरोधी पक्षांना बेजार करायचं. करोडो रुपयाची जागा चंद्रशेखर बावनकुळे यांना फुकटात दिली.''

15 लाखाचे पंधराशे का केले? लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला घेरलं
Uddhav Thackeray : भाजपच्या रोपट्याला गुलाबी अळी लागली, ठाकरेंनी अजित पवारांवर तोफ डागली

उपस्थित लोकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''विधानसभेसाठी जनतेने तुम्ही काय ठरवलं? इतक्या जोरात बोला की, समोरचा उमेदवार असेल तर येता कामा नये.'' ते म्हणाले, अमित शहा यांना शरद पवार यांना संपवायचं आहे, तुम्ही संपू देणार का? मला जनता संपू शकते अमित शहा संपवू शकत नाहीत.''

ते म्हणाले, ''दिल्ली वाल्याना जनता घरी बसवेल. आज दिल्ली आम्हाला डोळे वर करून दाखवत आहे. आज मी दिल्ली वाल्यांना सांगतो आम्हाला तुमची भीक नको आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे, आम्ही स्वाभीमानी आहोत.''

15 लाखाचे पंधराशे का केले? लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला घेरलं
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना फक्त मत मिळवण्यासाठी नाही, विरोधकांवर मुख्यमंत्री शिंदे बरसले

ते पुढे म्हणाले, ''आम्ही कर्जमाफी केली, पण कार्यक्रम घेतला नाही. सर्वांना हक्कचं दिलं होतं. हे मेळावे घेत आहेत. गाड्या आणत आहेत. आमचा पक्ष चोरला, निशाणी चोरली. उद्धव ठाकरेंना संपवण्यापूर्वी ही जनता पहावी, उद्धव ठाकरे हा माणूस नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com