Uddhav Thackeray : भाजपच्या रोपट्याला गुलाबी अळी लागली, ठाकरेंनी अजित पवारांवर तोफ डागली

Ajit Pawar : नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaamtv
Published On

Uddhav Thackeray On Ajit Pawar : नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना ठाकरेंनी आपल्या शैलीत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. त्यांनी भाजपला गुलाबी अळी आणि दाढीवाला डिंक्या रोग झाल्याची टीका केली.

नागपुरात संघाच्या मोहन भागवत यांना विचारू इच्छितो. यापद्धतीने भाजप हिंदुत्व तयार करत आहे, ते हिंदुत्व RSS भागवत यांना मान्य आहे का? संत्र्याला डिंक्या रोग आल्यावर खोड कोपरते, आता दाढीवाला डिंक्या रोग झाला आहे.

दाढीवाला खोडकिडा आणि (अजित पवारचा) गुलाबी बोंडअळी मोहन भागवत यांना मान्य आहे का? असा सवाल ठाकरेंनी नागपुरातील सभेत उपस्थित केला.

विधानसभेसाठी तुम्ही काय ठरवलं? इतक्या जोरात बोला की समोरचा उमेदवार असेल तर येता कामा नये. अमित शाह यांना पवारांना संपवायला संपू देणार आहेत का? मला जनता संपवू शकते अमित शाह संपवू शकत नाही, असे ठाकरे म्हणाले.

दिल्ली वाल्याना जनता घरी बसवेल. आज दिल्ली आम्हाला डोळेवर करून दाखवत आहे. आज मी दिल्ली वाल्यांना सांगतो आम्हाला तुमची भीक नको, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्ही स्वाभिमानी आहोत.

विद्यापीठाच्या निवडणुकीबद्दल काय म्हणाले ठाकरे ?

“जनतेचा अनादर किती करायचा? मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत १० पैकी १० जागा युवासेनेने जिंकल्या. सगळे पदवीधर आणि सुशिक्षित मतदार, त्यामध्येही आडकाठी आणली होती. दोन वर्ष सिनेट निवडणूक पुढे ढकलत होते. आता म्हणत आहेत की, जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरणारे आहेत. हो आहेच, सुशिक्षित मतदार होते”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com