Ajit Pawar addressing a minority community meeting in Pimpri-Chinchwad as Muslim Welfare Association announces support for NCP. Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

Ajit Pawar Gets Muslim Welfare Association Support In Pune: पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला.

Omkar Sonawane

पिंपरी-चिंचवड येथे काल अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या बैठकीत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत पाठिंबा देण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्क, सामाजिक सुरक्षा, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमस्वरूपी कटिबद्ध राहील, असा ठाम शब्द दिला.

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून वाटचाल करणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा त्यांनी नेहमीच सेक्युलर विचारधारेतून काम केले असून मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ते कायम उभे राहिले आहेत. प्रत्येक अडचणीच्या काळात मुस्लिम समाजाची साथ दिली आहे. समाजावर संकट आले असताना ते केवळ बोलघेवडे न राहता प्रत्यक्ष कृतीतून पाठीशी उभे राहिले, अशी भूमिका संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी भूमिका स्पष्ट केली.

याच विश्वासाच्या आणि अनुभवाच्या आधारावर मुस्लिम समाजाने पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सारंग यांनी सांगितले. या बैठकीस मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

Nashik Tourism: नाशिकमध्ये फिरायला गेलात? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ५ किल्ल्यांना नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

SCROLL FOR NEXT