Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले? वाचा

Railway Minister Ashwin Vaishnav : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ब्रिटिशकालीन गणवेशात मोठा बदल होणार असून बंद गळ्याचा काळा कोट आता औपचारिक पोशाख राहणार नाही, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी केली आहे.
Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले?  वाचा
Railway Minister Ashwin VaishnavSaam Tv
Published On
Summary
  • रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ब्रिटिशकालीन गणवेशात बदल

  • बंद गळ्याचा काळा कोट आता औपचारिक पोशाख राहणार नाही

  • गुलामी मानसिकता मागे सोडण्याचा संदेश रेल्वे मंत्र्यांनी दिला

  • निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

लाखो लोकांची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ब्रिटिश कालीन गणवेशात आता बदल होणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी केली आहे. बदलत्या काळानुसार जुन्या गोष्टी आयुष्यातून काढून टाकल्या पाहिजेत असे रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटले आहे.

रेल्वे मंत्र्यांनी शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात म्हटले की, आपण आपल्या विचारसरणीतून गुलामी मानसिकता काढून टाकली पाहिजे. आपली काम करण्याची पद्धत असो किंवा आपली वेशभूषा, आपण सर्वत्र या जुन्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत."

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले?  वाचा
Maharashtra Weather : २४ तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार, डीप डिप्रेशनचा फटका महाराष्ट्रालाही बसणार? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

ते पुढे म्हणाले, "आज मी पहिली घोषणा करत आहे. ब्रिटिशांनी आणलेला बंद गळ्यासह घालण्यात येणारा काळा कोट आता रेल्वेमध्ये औपचारिक पोशाख राहणार नाही ." हे फक्त रेल्वे गणवेशापुरते मर्यादित नाही. यामध्ये विद्यापीठाच्या पदव्युत्तर समारंभात घालण्यात येणारे गाऊन आणि टोप्या यांचा समावेश आहे.

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले?  वाचा
Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

शिवाय, औपचारिक प्रसंगी अधिकाऱ्यांनी घालावे लागणारे बंद गळ्याचे कोट देखील बदलण्याचा विचार केला जात आहे. दरम्यान रेल्वे मंत्रांच्या या आदेशाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बदलत्या काळासोबत जीवनवाहिनीचा देखील मोठा बदल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com