Maharashtra Weather : २४ तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार, डीप डिप्रेशनचा फटका महाराष्ट्रालाही बसणार? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात थंडीचा जोर काहीसा कमी झाला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. ढगाळ हवामान, पहाटे धुके आणि पुढील दिवसांत पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Maharashtra Weather : २४ तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार, डीप डिप्रेशनचा फटका महाराष्ट्रालाही बसणार? वाचा आजचा हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On
Summary
  • उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने थंडी ओसरली

  • राज्यात सध्या ढगाळ हवामान आणि किमान तापमानात वाढ

  • पुढील काही दिवसांत पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज

  • बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशनचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावर

उत्तरेकडील वारे वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढत होता. मात्र आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. पहाटे धुके आणि दव पडल्याचे पाहायला मिळत आहे. आज राज्यात किमान तापमानातील चढ-उतार कायम राहून, अंशतः ढगाळ हवामानासह गारठा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात तर पारा अगदी १० अंशाच्याही खाली आला होता. मात्र, आता ही थंडी ओसरताना दिसते आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन वादळ धुमाकूळ घालत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, त्यानंतर हळूहळू थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही रात्रीचा गारवा वाढणार असून, पहाटेच्या वेळी काही जिल्ह्यांत धुक्याचे सावट पाहायला मिळू शकते.

Maharashtra Weather : २४ तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार, डीप डिप्रेशनचा फटका महाराष्ट्रालाही बसणार? वाचा आजचा हवामानाचा अंदाज
Crime News : तुझी शेवटची इच्छा काय? सिगारेट अन् दारू पाजली, नंतर धारदार शस्त्राने वार करत मित्राला संपवलं; हत्याकांडाने पुणे हादरले

दरम्यान एकीकडे महाराष्ट्रात थंडीचा ओघ कमी होऊन वातावरण ढगाळ होणार आहे. तर, दुसरीकडे हवामान खात्याने स्पष्ट केले की, दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले डीप डिप्रेशन वादळ सध्या उत्तर-पश्चिम दिशेला सरकत आहे. हे १० जानेवारीच्या सुमारास श्रीलंका किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. या वादळामुळे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

Maharashtra Weather : २४ तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार, डीप डिप्रेशनचा फटका महाराष्ट्रालाही बसणार? वाचा आजचा हवामानाचा अंदाज
Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

डीप डिप्रेशन वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. महाराष्ट्रातही विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com