विदेशातील नोकरीच्या पॅकेजला भुलला
रत्नागिरीतील तरुणाची फसवणूक
विदेशातील कंपनीत शारीरिक, मानसिक छळ केला
गोपाल मोटघरे, पुणे
रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण विदेशातील नोकरीला भुलून सायबर स्लेवच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरघोस पगाराची नोकरी देते सांगून एका तरुणीने पीडित तरुणाला कंबोडिया येथे पाठवले. मात्र पुढे जे त्याच्यासोबत घडलं त्याने अंगावर काटा उभा राहिला. याप्रकरणी तरुणाने मायदेशी परतून पोलीस ठाणे गाठले.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील आयुष (बदलेलं नाव) मुंबईमध्ये एका जॉब एजन्सीच्या तरुणीच्या संपर्कात आला. त्या तरुणीने आयुषला कंबोडिया देशात एक लाख रुपये प्रत्येक महिना प्रमाणे डाटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी देण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर आयुषने स्वतःचे लाखो रुपये गोळा करून कंबोडिया एयरपोर्ट गाठलं. त्या ठिकाणी त्याला तीन ते चार चायनीज व्यक्ती घेण्यासाठी आले. त्यानंतर त्यांनी त्याला कंपनीमध्ये डाटा एन्ट्रीच जॉब देण्याऐवजी कस्टमर केअर एक्झिक्युटीव्ह जॉब दिला.
कस्टमर केअर एक्झिक्यूटिव् जॉब हा लोकांची मदत करण्यासाठी नसून, तो भारतीय लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यांची लाखो रुपयाची आर्थिक फसवणूक करण्याच काम आहे. हे आयुषच्या लक्षात आलं. त्यानंतर आयुषने कंपनीला काम करण्यास नकार दिला. त्यामुळे कंपनीतील लोकांनी आयुषला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
तसेच आयुषला कंपनीच्या बाहेर पाऊल ठेवण्याची मुभा देखिल या कंपनीने दिली नव्हती. कंपनीमध्ये काम करत असताना या आयुषला तेथील पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला संपर्क साधण्याची देखील मुभा नव्हती, त्यामुळे हा तरुण त्या ठिकाणी चार महिने सायबर स्लेव्हच्या जॉब मध्ये अडकून फसला होता. मात्र सुदैवाने त्या कंपनीतून आयुषने आपली सुटका करून आपला भारत देश गाठला. दरम्यान पोलिसांनी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.