बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

Annamalai says Bombay is not a city of Maharashtra controversy : बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं भाजप नेते के. अण्णामलाई यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अण्णामलाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

BJP leader Annamalai statement on Bombay international city : बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे असं विधान भाजप नेते 'अण्णामलाई यांनी केलेय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण आणखी तापलेय. महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना अण्णामलाई यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. 'अण्णामलाईंवर गुन्हा दाखल झाला पाहीजे' अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली.

मुंबई मनपा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपकडून देशभरातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुंबईतील प्रभाग क्र. 47 मध्ये प्रचारासाठी तामिळनाडूतील भाजप नेते के. अण्णामलाई आले होते. प्रचारादरम्यान त्यांनी 'बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे' असे वक्तव्य केले. त्यावरून संजय राऊतांनी संताप व्यक्त करत 'अण्णामलाई यांना अटक व्हायला हवी', असे म्हटले.

 केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपा महापौर असेल. बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे,असे के. अण्णामलाई म्हणाले. तर 106 हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन ताबडतोब अटक केली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com