राज ठाकरेंचा मुंबईत नवा डाव; गुजराती आणि मुस्लिम उमेदवार मैदानात|VIDEO

Raj Thackeray New Political Strategy: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मनसेने गुजराती आणि मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरवत मोठा राजकीय डाव खेळला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मनसेने मोठा राजकीय डाव खेळला आहे. मराठी विरुद्ध अमराठी वाद तापलेला असताना, मनसेने थेट गुजराती आणि मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मनसेकडून वॉर्ड क्रमांक 177 माटुंगा येथून हेमाली भन्साली या गुजराती उमेदवाराला रिंगणात उतरवण्यात आलं आहे. याशिवाय वॉर्ड क्रमांक 188 धारावी येथून आरिफ शेख, तर वॉर्ड क्रमांक 209 भायखळा येथून हसीना माहीमकर हे मुस्लिम उमेदवार मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.

विशेष म्हणजे मुंबईत सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा राजकीय वाद जोर धरत असताना, मनसेचा हा निर्णय अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. एकीकडे भाजप उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखत असताना, मनसेने अल्पसंख्याक आणि अमराठी समाजाला थेट प्रतिनिधित्व देत वेगळी राजकीय मांडणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com