

२९ महापालिकांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी
हजारो उमेदवारांचे नगरसेवक होण्याचं स्वप्न
१६ जानेवारी रोजी मोजक्या उमेदवारांच्या गळ्यात पडणार नगरसेवकाची माळ
राज्यातील २९ महापालिकामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या महापालिकांमध्ये उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळत आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्यात २९ महापालिकांमध्ये ३३६०६ जणांचं नगरसेवक व्हायचं स्वप्न आहे. त्यामुळे येत्या १६ जानेवारी रोजी नगरसेवकाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे स्पष्ट होईल.
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांनी उमेदवारांबाबत गोपनीयता ठेवली. राजकीय पक्षांनी बंडखोरी रोखण्यासाठी यादी जाहीर न करता उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. एबी फॉर्म वाटूनही भाजप आणि ठाकरे गटासह इतर पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागला. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाल्याचे आकडेवारीतून समोर आलं आहे.
मुंबईतही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मुंबईत एकूण २२७ वॉर्ड आहेत. या २२७ वॉर्डात एकूण २५१६ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांपैकी फक्त २२७ जणांच्या गळ्यात नगरसेवकाची माळ पडणार आहे. तर पुण्यात एकूण ४१ वॉर्ड आहेत. त्यासाठी १६५ जागा आहेत. या पुणे शहरात ३००० हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यामुळे पुण्यातही निवडणुकीची एक रणधुमाळी पाहायला मिळत आहे.
राज्यातील पनवेल महापालिकेत उमेदवारांचे सर्वाधिक कमी अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ इंचलकरंजीमध्ये सर्वाधिक कमी उमेदवार रिंगणात आहेत. पनवेलमध्ये ३९१ अर्ज जमा झाले आहेत. तर इंचलकरंजीमध्ये ४५६ अर्ज जमा झाले आहेत. तर काही महापालिकेत उमेदवार बिनविरोध जिंकून येत आहेत. त्यामुळे निकालाआधीच काही उमेदवारांनी विजयाचा उधळल्याचे समोर आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.