27 villages under kdmc will get property tax bill as per 2017
27 villages under kdmc will get property tax bill as per 2017 Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli: 27 गावांच्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या लढ्याला आले यश, मालमत्ता कर आकारणीविषयी दिली महत्वपूर्ण माहिती

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावातील नागरीकांना पुन्हा जून्या दराने मालमत्ता कर आकारणी केली जाणार आहे अशी माहिती 27 गावातील सर्व पक्षीय संघर्ष समितीने आज (गुरुवार) साम टीव्हीशी बाेलताना दिली. संघर्ष समितीच्या लढ्याला यश आले आहे असून राज्य सरकारचे समितीतर्फे गजानन मांगरुळकर यांनी आभार मानले.

गजानन मांगरुळकर म्हणाले कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावातील नागरीकांना 10 पट जास्त मालमत्ता कराची आकारणी केली जात होती. या कर आकारणीचे फेरमूल्यांकन करण्याकरीता राज्य सरकारने समिती नेमली होती. 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने कर आकारणीविषयी 265 पानांचे निवेदन दिले होते.

त्यानंतर 7 मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत 27 गावातील नागरीकांना 2016-17 सालानुसारच कर आकारणी केली जाईल असा निर्णय घेतला गेला. त्याचे इतिवृत्त प्राप्त झाले आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना 2016-17 नुसार कर आकारणीची बिले दिले जातील अशी माहिती संघर्ष समितीचे पदाधिकारी गजानन मंगरुळकर यांनी दिली आहे.

यासंदर्भात समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार आणि उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्यासह कर आकारणी विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांची भेट घेतली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant- Radhika Wedding News : राधिका- अनंत अंबानी यांच्या लग्नात सजणार सुरांची मैफल, बॉलिवूडचे दिग्गज गायक करणार लाईव्ह परफॉर्मन्स

Worli Hit And Run Case: हिट अँड रन प्रकरणात पोलिसांना झटका; न्यायालयीन कोठडी होताच राजेश शहा यांची जामिनासाठी धाव

Mumbai Rain Video: मुंबईत ३०० मिलीमीटर एवढा पाऊस, सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Jui Gadkari: जुईगडकरीचं सौंदर्य पाहून मन झालं घायाळ

Mumbai Rain News: लोकल प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी, लोकल ट्रेनची विस्कळीत झालेली सेवा सुरळीत

SCROLL FOR NEXT