KDMC News: कल्याण पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न सुटणार, महापालिका आयुक्तांचे महेश गायकवाडांना ठाेस आश्वासन

kdmc commissioner indurani jakhar assures mahesh gaikwad about regular water supply in kalyan east : कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, ग्रामीण भागातील आशेळे माणेरे, नांदीवली परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा सूर वाढला आहे.
kdmc commissioner indurani jakhar assures mahesh gaikwad about regular water supply in kalyan east
kdmc commissioner indurani jakhar assures mahesh gaikwad about regular water supply in kalyan eastSaam Digital

- अभिजीत देशमुख

कल्याण पूर्व भागातील बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे टाकायचे कामही 90 टक्के पूर्ण झाले आहे. अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर कल्याण पूर्वेतील पाण्याची समस्या राहणार असं आश्वासन महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना दिले.

कल्याण पूर्व परिसरातील खडगोलवलीसह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येने ग्रासले आहे. पाणीटंचाई बाबत नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली मात्र पाणी समस्या जैसे थे आहे. अखेर आज शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत पाणी प्रश्नावर ताेडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

kdmc commissioner indurani jakhar assures mahesh gaikwad about regular water supply in kalyan east
Somatane Toll Plaza: स्थानिकांसाठी सोमाटणे नाका टोलमुक्त आश्वासन हवेत, नागरिक संतप्त

यावेळी पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याच्या दाबा बाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. तसेच कल्याण पूर्व येथील बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे टाकायचे कामही 90 टक्के पूर्ण झाले आहे. अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर कल्याण पूर्वेतील पाणी समस्या निकाली निघेल असं आश्वासन दिले.

Edited By : Siddharth Latkar

kdmc commissioner indurani jakhar assures mahesh gaikwad about regular water supply in kalyan east
Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com