Kalyan: दाेन वर्षांच्या मुलीला साई शिर्डी नगर एक्स्प्रेसमध्ये काेणे साेडून गेले? कल्याण रेल्वे पोलिसांकडून शाेध सुरु

unidentified two year old girl found in sai shirdi nagar express : कल्याण रेल्वे पोलिसांनी संबंधित मुलीला एक्स्प्रेस मध्ये कोणीतरी जाणीवपूर्वक सोडून दिलाचा संशय व्यक्त केला आहे. सध्या मुलीच्या पालकांचा शोध सुरू आहे.
unidentified two year girl found in sai shirdi nagar express
unidentified two year girl found in sai shirdi nagar expressSaam Digital

- अभिजित देशमुख

साई शिर्डी नगर एक्स्प्रेसमध्ये दोन वर्षांची अनाेळखी मुलगी एकटीच झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. तिच्या पालकांची शाेध शाेध केली असता काेणीच पुढे न आल्याने अखेर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी सध्या तिचे पालकत्व स्विकारले आहे. दरम्यान मुलीला कुणी तरी जाणीवपूर्वक रेल्वेत सोडून दिल्याच्या संशयावरुन अनाेळखी व्यक्तीवर गुन्हा नाेंदविला आहे. पाेलिस सध्या तिच्या पालकांचा शोध घेताहेत.

रेल्वे पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बुधवारी दुपारच्या सुमारास साई शिर्डी नगर एक्सप्रेस मध्ये काही प्रवाशांना दोन वर्षाची मुलगी एकटीच झोपली असल्याचे लक्षात आले. कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार प्रवाशांना समजला. त्यानंतर प्रवाशांनी डब्यात विचारपूस करतच तिच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला. कोणीच आढळून न आल्याने प्रवाशांनी संशय आला.

unidentified two year girl found in sai shirdi nagar express
Worli Constituency : आदित्य ठाकरेंचं कर्तृत्व शून्य, विधानसभा निवडणुकीत आपटणार : निलेश राणे

त्यांनी दादर येथे उतरून या दोन वर्षाच्या चिमुकलीला दादर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. या मुलीचा हात फ्रॅक्चर हाेता. पाेलिसांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला बालगृहात नेण्यात आले. तिच्या पालकांचा पाेलिस शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

unidentified two year girl found in sai shirdi nagar express
धाराशिव : 11 दिवसांपासून महसूलचे कामबंद आंदाेलन, शेतक-यांसह विद्यार्थ्यांची कामे खोळंबली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com