Pimpri Chinchwad News : विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी संचालक अटकेत, शैक्षणिक शुल्क परताव्यासाठी पालकांचे पिंपरी चिंचवडमध्ये ठिय्या आंदाेलन

Pimpri Chinchwad News : या अकादमीच्या संचालकाला अटक झाल्याने जानेवारी महिन्यापासून अकादमी बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
parents and student protests in pimpri chinchwad
parents and student protests in pimpri chinchwadSaam Tv
Published On

Pimpri Chinchwad :

विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पाेलिसांनी एका शैक्षणिक अकादमीच्या संचालकास नुकतीच अटक केली. दरम्यान संचालकास अटक झाल्याने संबंधित अकादमीच्या बाहेर राज्यभरातील संतप्त पालकांनी शैक्षणिक शुल्क परत मिळावेत अशी मागणी करीत ठिय्या आंदोलन केले. (Maharashtra News)

या अकादमीत राज्यातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्ज काढून तर कुणी शेत जमीन विकून लाखो रुपये शैक्षणिक शुल्क म्हणून अकादमीत जमा केले आहेत.

parents and student protests in pimpri chinchwad
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्यापासून अवजड वाहनांना बंदी, काय आहे नेमकं कारण?

या अकादमीच्या संचालकाला अटक झाल्याने जानेवारी महिन्यापासून अकादमी बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. या बराेबरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क देखील बुडाल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्था साेडल्याचा दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना इतर स्कूल किंवा महाविद्यालयात प्रवेश देखील मिळन नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त प्रशासनाने तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क परत मिळवून देण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

parents and student protests in pimpri chinchwad
Success Story : काेराेना काळात नाेकरी गेली, पठ्ठ्याने हार न मानता द्राक्षच्या पंढरीत फुलवली सफरचंदाची बाग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com