Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्यापासून अवजड वाहनांना बंदी, काय आहे नेमकं कारण?

Heavy Vehicles Banned on Mumbai Pune Expressway: त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून अवजड वाहन मालक, चालक संघटनांना शनिवार ते मंगळवार पर्यंत अवजड वाहनं पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आणू नयेत असे आवाहन केले आहे.
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्यापासून अवजड वाहनांना बंदी
Heavy Vehicles Banned on Mumbai Pune Expressway from 6 to 9 April 2024Saam TV
Published On

Mumbai Pune Expressway Update:

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर महामार्ग पाेलिसांनी मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणा-या लेनवर उद्यापासून (शनिवार, ता. 6 एप्रिल) मंगळवार (ता. 9 एप्रिल) पर्यंत अवजड वाहनांना बंदी (heavy vehicles banned on mumbai pune expressway from 6 to 9 april) घातली आहे. याची नाेंद वाहतुकदारांनी घ्यावी असे आवाहन महामार्ग पाेलिसांनी साम टीव्हीच्या माध्यमातून केली आहे. (Maharashtra News)

उन्हाचा पारा चाळीस अंश पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर वाहनांचे टायर गरम होऊन फुटण्याची शक्यता असते. तसेच वाहनांचे इंजिन गरम होऊन आग लागण्याची शक्यता असते. या घटनांमुळे बोरघाटात वाहतुक ठप्प हाेते.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्यापासून अवजड वाहनांना बंदी
Success Story : 'अळू'ने दाखविला शेती उत्पन्नाचा मार्ग, कामशेत बाजारपेठेत गायकवाडांच्या अळूला माेठी मागणी

या घटना टळाव्यात यासाठी महामार्ग पोलिसांनी एक युक्ती तयार केली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना सहा एप्रिल ते नऊ एप्रिल पर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर बंदी घालण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून अवजड वाहन मालक, चालक संघटनांना शनिवार ते मंगळवार पर्यंत अवजड वाहनं पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आणू नयेत असे आवाहन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्यापासून अवजड वाहनांना बंदी
सातारा मतदारसंघात महायुती, मविआचे उमेदवार का जाहीर हाेईनात? उदयनराजेंचे दिलखूलास उत्तर, 'बच्चा समझ के छाेड दिया'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com