मावळ तालुका हा इंद्रायणी भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र कांब्रे गावातील लक्षीबाई गायकवाड (laxmi gaikwad) यांनी आपल्या परसबागेत अळूची पानाची शेती फुलवून दरवर्षी त्याचे उत्पादन घेत आहे. या उत्पादनामुळे त्या घरखर्चाला हातभार लावतात. (Maharashtra News)
पावसाळ्याखेरीज इतर हंगामातही सेंद्रिय खतावरील अळूच्या पानांचे उत्पादन हे गायकवाड कुटुंबाचे मुख्य पीक बनले आहे. अळू ही पावसाळी पाण्यावर उगवणारी भाजी आहे. या पानांची भाजी किंवा वड्या मावळच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही आवडीने खाल्ल्या जातात.
इतर हंगामातही नाणेमावळातील कांब्रे गावातील शेतकरी लक्षीबाई गायकवाड यांनी ती आपल्या परसबागेत फुलवली आहे. गायकवाड कुटुंबीयांनी अळू हे पीक आपल्या शिवारात फुलवून त्याचे उत्पादन घेत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या पिकातून त्यांनी कुटुंबाचे वर्षभराचे आर्थिक गणित बसवले आहे. कांब्रे गावापासून पाच किलोमीटर अंतरावर कामशेत ही मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत कोणत्या भाजीपाल्याची आवक कमी असते याचा विचार लक्ष्मी गायकवाड यांनी केला.
अळू हे पीक व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरू शकते हे त्यांनी अभ्यासले. त्यामुळे त्यांनी या अळू पिकाच्या उत्पादनात आता सातत्य जपले आहे. तर त्यांच्या विक्रीची जबाबदारी ही लक्ष्मी गायकवाड घेत आहेत. त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर गायकवाड कुटुंब हे स्वतः शेती पिकवून त्याला बाजारपेठेत विक्रीचे काम देखील कुटुंबात केले जाते. त्यामुळे जास्त नफा त्यांना मिळतो.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.