धाराशिव : 11 दिवसांपासून महसूलचे कामबंद आंदाेलन, शेतक-यांसह विद्यार्थ्यांची कामे खोळंबली

dharashiv revenue department kaam bandh andolan: जनहित शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने महसूल कर्मचारी आंदाेलनावर निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली.
dharashiv revenue department kaam bandh andolan hits government services since 11 days
dharashiv revenue department kaam bandh andolan hits government services since 11 days Saam Digital

- बालाजी सुरवसे

धाराशिव जिल्ह्यातील गेल्या 11 दिवसांपासून सुरु असलेल्या महसूल कर्मचा-यांच्या काम बंदचा सर्वाधिक फटका शेतक-यांसह विद्यार्थ्यांना बसला आहे. दरम्यान आंदाेलनावर ताेडगा काढावा अन्यथा नागरिकांची काम खाेळंबल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करुन निलंबित करावे अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

बनावट दस्तऐवज प्रकरणी धाराशिवचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्यासह तिघांविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी नियमबाह्य केल्याचा आरोप करत पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी महसुल कर्मचाऱ्यांनी गेले 28 मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

dharashiv revenue department kaam bandh andolan hits government services since 11 days
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा : तब्बल 12 वर्षानंतर मळेकरांच्या नंद्या- संद्या बैलजोडीला मिळाला मान

दरम्यान या आंदोलनामुळे विद्यार्थी, शेतकरी याचे नुकसान झाल आहे. त्यामुळे गुन्ह्यात फरार असलेले धाराशिवचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांना तात्काळ अटक करावी. याचबरोबर आचारसंहिता काळापासुन हे आंदोलन केल्याने आचारसंहितेचा भंग झाला असुन त्यामुळे आंदोलनातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करुन निलंबित करावे अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

dharashiv revenue department kaam bandh andolan hits government services since 11 days
Worli Constituency : आदित्य ठाकरेंचं कर्तृत्व शून्य, विधानसभा निवडणुकीत आपटणार : निलेश राणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com