इंजिनिअरिंग,पॉलिटेक्निकसह आयटीआयच्या शेकडो विद्यार्थ्यांचा महावितरण कार्यालयापुढे ठिय्या (पाहा व्हिडिओ)

sambhajinagar students protest at mahavitran office demands to conduct exam: महावितरणने सन 2003 मध्ये अभियंता आणि तांत्रिक सहाय्यक या पदांची परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी आक्रमक झालेत.
sambhajinagar students protest at mahavitran office demands to conduct exam
sambhajinagar students protest at mahavitran office demands to conduct exam Saam Tv

- रामनाथ ढाकणे

महावितरणने रद्द केलेली भरती विधानसभा निवडणुकीपूर्वी घ्यावी या मागणीसाठी आज (गुरुवार) छत्रपती संभाजीनगर येथे शेकडाे विद्यार्थ्यांनी महावितरण कार्यालयासमाेर आंदाेलन केले. त्यापूर्वी विद्यार्थ्यांनी क्रांती चौक ते महावितरण कार्यालय असा मोर्चा काढला हाेता.

या आंदाेलन प्रसंगी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन महावितरण अधिका-यांसह सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आमच्या आई-वडिलांनी केलेला खर्च परत द्या आणि परीक्षा नाही तर नोकरी नाही असा आशय फलकांवर हाेता.

sambhajinagar students protest at mahavitran office demands to conduct exam
Amboli Waterfall: आंबाेली घाटात धबधब्यावर पर्यटकांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO बघा!

या आंदाेलनात पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा माेठ्या संख्येने सहभाग हाेता. सुमारे एक ते दीड तास विद्यार्थ्यांनी आंदाेलनस्थळी घाेषणाबाजी केली. यावेळी कायदा व सुवव्यस्था अबाधित राहावी यासाठी पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला आहे.

Edited By : Siddharth Latkar

sambhajinagar students protest at mahavitran office demands to conduct exam
Wardha News : कॅन्टीन कर्मचा-याचा प्रामाणिकपणा, साेन्याच्या दागिन्यांची पर्स केली परत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com