काँग्रेस खासदार प्रतिभा धानाेरकरांच्या भावासह 9 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण? (पाहा व्हिडिओ)

chandrapur police charged pravin kakade : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसू लागल्याने बुधवारी खासदार प्रतिभा धानोरकर या व्यवस्थापनासमवेत चर्चा करीत असताना घडला हाेता मारहाणीचा प्रकार.
chandrapur police charged mp prathibha dhanorkar brother pravin kakade and congress karyakarta for hitting officer
chandrapur police charged mp prathibha dhanorkar brother pravin kakade and congress karyakarta for hitting officer Saam Digital

कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ केल्या प्रकरणी काॅंग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्यासह निलेश भालेराव व आठ ते नऊ जणांवर चंद्रपूर येथील भद्रावती पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंद झाला आहे. पाेलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच बुधवारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे हे आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्यावेळी कार्यकर्ते देखील आक्रमक झाले हाेते. पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत अधिका-यांना सरंक्षण दिली. या घटनेची तक्रार केपीसीएल कंपनीने भद्रावती पोलिस ठाण्यात केली.

chandrapur police charged mp prathibha dhanorkar brother pravin kakade and congress karyakarta for hitting officer
Maharashtra Police Bharti 2024: काॅन्स्टेबलसाठी इंजिनिअर, एमबीए, एमसीएचे विद्यार्थीही इच्छुक, शेकडाेंच्या संख्येने उतरले मैदानात

पाेलिसांनी खासदार धानाेरकर यांचे बंधू प्रवीण काकडे, कार्यकर्ते निलेश भालेराव यांच्यासह आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान या घटनेमुळे खासदार धानोरकर यांच्या प्रतिमेला मोठा धक्का पोचला आहे.

Edited By : Siddharth Latkar

chandrapur police charged mp prathibha dhanorkar brother pravin kakade and congress karyakarta for hitting officer
सांगली जिल्हा बँकेवर प्रशासक? फडणवीसांशी चर्चा, पडळकरांनी स्पष्टच सांगितलं; 25 जूनला चाबूक माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com