काँग्रेस खासदाराच्या भावाची अधिका-यास शिवीगाळ, मारहाणीच्या घटनेने उडाला गाेंधळ (पाहा व्हिडिओ)

MP Prathibha Dhanorkar : वारंवार कंपनीला निवेदने देऊनही समस्या मार्गी लागल्या नाहीत. त्यामुळे आंदोलन करावे लागले. यापुढे असेच सुरु राहिले तर काम बंद केले जाईल असा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अधिका-यांना मारहाण, शिवीगाळच्या घटनेनंतर दिला.
mp prathibha dhanorkar brother and congress karyakarta hits officer video viral in chandrapur
mp prathibha dhanorkar brother and congress karyakarta hits officer video viral in chandrapur Saam Digital
Published On

खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्याकडून तसेच काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ केल्याचा प्रकार समाेर आला आहे. या प्रकारामुळे काही काळ गाेंधळ निर्माण झाला. दरम्यान या प्रकाराची चर्चा चंद्रपूर शहरात सुरु असतानाच असे काही घडले नाही अशी प्रतिक्रया कर्नाटक एम्टा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी साम टीव्हीशी बाेलताना देत अधिक बोलण्यास नकार दिला.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. ही खाण कर्नाटक सरकारची आहे. या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसू लागला आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांबाबत व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर या गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत धानाेरकरांचे बंधू प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त होते.

mp prathibha dhanorkar brother and congress karyakarta hits officer video viral in chandrapur
Kolhapur Law and Order : कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली; सतेज पाटील यांना का सतावतेय चिंता?

अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता-करता शिवीगाळ केली. त्याचवेळी अधिका-याच्या पाठीमागे उभे असलेल्या एकाने अधिकाऱ्यांला थप्पड लगावली. यानंतर एकच गोंधळ उडाला.

यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारा मारा अशी चिथावणीची भाषा सुरु केली. दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याला फार यश आले नाही. यावेळी जमावातून अधिकाऱ्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले.

mp prathibha dhanorkar brother and congress karyakarta hits officer video viral in chandrapur
Maharashtra Police Bharti 2024: काॅन्स्टेबलसाठी इंजिनिअर, एमबीए, एमसीएचे विद्यार्थीही इच्छुक, शेकडाेंच्या संख्येने उतरले मैदानात

अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची, मागण्या ठेवण्याची एक पद्धत असते, शिष्टाचार असतो, पण यावेळी तो पाळण्यात आला नाही. खुद्द खासदारांच्या सख्ख्या भावानेच शिवीगाळ करायला सुरुवात केल्याने निकाल लागताच मुजोरी आल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, यासंदर्भात कर्नाटक एम्टा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी यावर बोलण्यास नकार दिला. त्यांनी केवळ असे काही घडले नाही असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

mp prathibha dhanorkar brother and congress karyakarta hits officer video viral in chandrapur
Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com