अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवणार? नाचक्की टाळण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय, VIDEO

आता मध्य पूर्वेत आणखी मोठा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे...कारण अमेरिकेनं इराणमध्ये लष्कर घुसवण्याची योजना आखलीय... मात्र अमेरिकेनं किती सैनिक आणि युद्धनौका पाठवल्या आहेत... पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
 Middle East war tension
US Iran conflictSaam tv
Published On

मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराणमधील युद्ध आणखी भडकण्याची चिन्हं आहेत...कारण अमेरिका इराणमध्ये लष्कर घुसवणार आहे... त्यासाठी अमेरिकेनं आता आपली सर्वात अत्याधुनिक USS त्रिपोली लायटनिंग कॅरियर ही विध्वंसक युद्धनौका इराणच्या दिशेनं रवाना केलीय... पहिल्यांदाच अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवून हवाई, समुद्र आणि जमिनीवरुन इराणवर हल्ले चढवण्याच्या तयारीत आहे..

अमेरिका इराणमध्ये लष्कर घुसवणार?

USS त्रिपोली लायटनिंग कॅरियर ही अत्याधुनिक विध्वंसक युद्धनौका मानली जाते...या युद्धनौकेचं वजन 45 हजार टन इतकं असून 844 फूट इतकी तिची लांबी आहे.. समुद्रातून थेट जमीनीवर हल्ला करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे... विशेष म्हणजे या युद्धनौकेवर अडीच हजार कमांडो, रडारपासून बचाव करत टार्गेटवर हल्ला करणारे स्टेल्थ फायटर जेट्स आणि अॅम्फीबियस क्षमता असलेली जहाजं आहेत.

 Middle East war tension
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टी बुडाली शोकसागरात

दुसरीकडे इराणच्या लष्कर प्रमुखांनी हिंद महासागरात अमेरिकेनं बुडवलेल्या जहाजाचा बदला घेण्याचा निर्धार केलाय.

खरं तर अमेरिकेनं इस्रायलमध्ये आपली विध्वंसक USS अब्राहम लिंकन युद्धनौका पाठवली होती.. मात्र इराणने याच युद्धनौकेवर हल्ले चढवून मोठं नुकसान केल्याचा दावा केला... पुढे अमेरिकेनं USS जेरॉल्ड आर फोर्ड ही आणखी विध्वंसक युद्धनौका पाठवून इराणला घेरण्याचा प्रयत्न केला.

 Middle East war tension
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टी बुडाली शोकसागरात

इराणच्या अनेक जहाजांना याच युद्धनौकेनं घेरलं....मात्र त्यानंतरही इराण काही थांबत नाही. त्यामुळे आपली नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेनं आपली आणखी विध्वंसक आणि अत्याधुनिक USS त्रिपोली लायटनिंग कॅरियर आणि सैन्य पाठवलंय... विशेष म्हणजे 2003 मधील इराक युद्धानंतर अमेरिकेनं पहिल्यांदाच युद्धनौकांचा ताफा पाठवलाय... मात्र अमेरिकेच्या या युद्धनौकेला रोखण्यात इराण यशस्वी होणार की इराणच्या जमिनीवर युद्ध पेटणार याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com