

ज्येष्ठ अभिनेत्री मधू मल्होत्रा यांचे निधन
त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा
अनेक सेलिब्रिटींकडून श्रद्धांजली
Madhu Malhotra dies : सिनेसृष्टीतून एक दु:खद वार्ता समोर आली आहे.प्रसिद्ध अभिनेत्री मधू मल्होत्रा यांचं निधन झालं. मधू यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मधू मल्होत्रा यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री मधू यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री मधू मल्होत्रा यांचे १३ मार्च रोजी निधन झालं. सिने निर्माता सुभाष घई यांनी दिवंगत अभिनेत्री मधू मल्होत्रा यांना श्रद्धांजली वाहिली. सुभाष घई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'मधू यांचं व्यक्तिमत्व चांगले होते'. त्यांनी 'लंबी जुदाई' गाण्याचा किस्सा सांगितला.
सुभाष घई यांनी पुढे सांगितलं की, 'मला पडद्यावर उत्तर भारतीय अभिनेत्रीची गरज होती. ज्या महिलेचे डोळे चमकणारे असावे. त्यांचं गाणं खूप प्रसिद्ध झालं. मी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी भावना व्यक्त करतो. मधू मल्होत्रा 'सत्ते पे सत्ता', रिश्ता कागज का, कर्ज ,हिरो , विश्वनाथ आणि कयामत सारख्या सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
अभिनेत्री मधू मल्होत्राचे १३ मार्च रोजी मुंबईत निधन झालं. अभिनेत्री मधू यांनी वयाच्या ७१ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर ओशिवाराच्या स्मशानात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या राहत्या घरी पोहोचले.
मधू मल्होत्रा यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अनेक जण त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या अभिनयाची सदैव आठवण काढली जाईल, अशी भावना व्यक्त केल्या जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.