Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा चढ उताराचा खेळ सुरु; काही जिल्ह्यात पावसाची शक्यता, हवामान कसं असेल?

Weather Update: देशासह राज्यात तापमानात हळहळू घट होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Weather Update News:

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रिवादळाचा हवामानावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशातील हवामानात बदल होताना दिसून येत आहे. देशासह राज्यात तापमानात हळहळू घट होताना दिसत आहे. हवेत गारवा जाणवू लागला आहे. याचदरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या वातावरणामुळे उद्या म्हणजे गुरुवारी राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यात तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. वातावरणात बदल झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात २३ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आज बुधवारी राज्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात उद्या गुरुवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जोरदार वारा आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील २४ तासांत देशातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागपुरात पावसाची शक्यता

राज्यात पुढील काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नागपुरात २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपुरात हलक्या स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नागपूरसह विदर्भात तापमान तापमान सरासरी १६ अंश असून १२ अंशापोक्षा खाली गेल्यावर थंडी अनुभवता येणार आहे. त्यामुळे सध्या तरी नागपूरात थंडी पडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

२५ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण तयार होणार असून थंडी कमी जाणवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

देशातील या भागात पावसाची शक्यता

देशातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तमिळनाडू, दक्षिण कर्नाटक, केरलमध्ये २२ नोव्हेंबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आंध्र प्रदेश, तेलंगणा, लक्षद्वीप, ओडिशा, छत्तीसगडच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर २३ नोव्हेंबरला पश्चिम हिमालयात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT