

मिस इंडिया अर्थ २०१९ ची विजेती सायली सुर्वे पुन्हा हिंदू धर्मात परतली
२०१९ मध्ये तिने आतिफ तासेसोबत प्रेमविवाह करून धर्मांतर केले होते
लग्नानंतर छळ होत असल्यामुळे सायली परत घरी आली
होम-हवन आणि शुद्धीकरण विधीनंतर सायली हिंदू धर्मात परत आली
२०१९ मध्ये 'मिस इंडिया अर्थ'चा किताब जिंकणारी आणि प्रसिद्ध मॉडेल सायली सुर्वेने पुन्हा हिंदू धर्मात वापसी केली आहे. सायली सुर्वेने घरच्यांच्या विरोधात जाऊन २०१९ मध्ये मीरा भाईंदर येथील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासेसोबत लग्न केले होते. पण लग्नानंतर वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून सायलीने महिला दिनाचे औचित्य साधून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. होम-हवन आणि मंत्रोच्चार करून सायली सुर्वेने हिंदू धर्मात प्रवेश केला. सायलीने आतिफसोबत लग्न केल्यानंतर तिचे धर्मांतर करण्यात आले होते आणि तिचे नाव अतेझा तासे ठेवण्यात आले होते. पण आता हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केल्यानंतर तिने आपले नाव आद्या सुर्वे असे केले आहे.
२०१९ ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील सुंदरी सायली सुर्वेचं शुद्धीकरण करून तिला हिंदू धर्मात समाविष्ट करण्यात आलं. पिंपरी- चिंचवडमधील रहिवासी असलेल्या सायलीने आतिफच्या प्रेमात वेडं होत २०१९ मध्ये घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. आतिफच्या प्रेमाखातर तिने धर्मांतर देखील केले. धर्म बदलल्यानंतर तिचे नाव देखील बदलण्यात आले होते. अतेझा तासे असे तिचे नाव ठेवण्यात आले होते. पण लग्नानंतर तिचा नवरा आतिफ आणि सासरची मंडळी तिचा छळ करत होते. हा छळ होत असताना देखील सायली त्याच ठिकाणी १० वर्षे राहिली. पण छळ वाढत चालल्यामुळे सायलीने पुन्हा हिंदू धर्मात येण्याचा आणि आई-वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला.
हिदुत्ववादी संघटनांच्या मार्फत सायली सुर्वेला परत हिंदू धर्मात घेण्यात आले. होम- हवन मंत्रोच्चार आणि शुद्धीकरण करत तिला हिंदू धर्मात प्रवेश करण्यात आला. सायली सुर्वेच लग्नानंतर अतेझा तासे असं नामकरण करण्यात आलं होतं. ते नाव बदलून शुद्धीकरण प्रक्रियेत पुन्हा तिचं नामकरण करत तिला अद्या सुर्वे हे नावं देण्यात आलं. आतिफसोबत लग्न केल्यानंतर १० वर्षात सायलीला ४ मुलं झाली. या मुलांसाठीच ती सासरच्यांकडून होणारा त्रास सहन करत होती. पण संयम तुटल्यानंतर तिने मुलांच्यासाठीच आतिफला सोडण्याचा आणि हिंदू धर्मात परत येण्याचा निर्णय घेतला.
आतिफ तासेशी लग्न करणे आपली चूक होती, लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि आपलं धर्मांतरण देखील केलं गेल्याचा आरोप सायलीने केला. या बाबत अनेकवेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत सायलीने बोलून दाखवली. अनेक प्रयत्न केल्यानंतर आपण हिदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात आलो आणि आता त्यांच्या मार्फतच मला हिंदुधर्मात प्रवेश दिला गेल्याचे सायलीने सांगितले. यावेळी सायलीने ज्या मुली असे प्रकार सहन करतात त्यांनी असे प्रकार सहन करू नये असे आवाहन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.