Dhurandhar 2 Trailer: 'हिंदू बहुत ही डरपोक कौम...', हमजा झाला ल्यारीचा बादशाह, 'धुरंधर २' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिलात?

Dhurandhar 2 Trailer: धुरंधर २: द रिव्हेंजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यावेळी, हमजा म्हणजेच ​​रणवीर सिंग आधीपेक्षा जास्त जबरदस्त अॅक्शन करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.
Dhurandhar 2 Trailer
Dhurandhar 2 TrailerSaam Tv
Published On

Dhurandhar 2 Trailer: बहुप्रतिक्षित आदित्य धरचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हमजा उर्फ ​​जसकीरत सिंग रंगीच्या भूमिकेत रणवीर सिंग पूर्वीपेक्षाही जास्त जबरदस्त अॅक्शन करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाचा दुसरा भाग चार महिन्यांनंतर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. अ‍ॅक्शन आणि रक्तपाताने भरलेल्या या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या १२ दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला.

Dhurandhar 2 Trailer
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घेतली प्रॉपर्टी; राम मंदिराजवळील कोट्यवधींची जमीन केली खरेदी

"हिंदू हा एक अतिशय भित्रा समुदाय आहे. आम्ही शेजारी राहतो. तुमची सर्व शक्ती वापरा आणि जे काही शक्य आहे ते नष्ट करा." या अंगावर काटा आणि मस्तकात राग आणणाऱ्या वाक्याने या ट्रेलरची सुरुवात होते. ३ मिनिटांचा २५ सेकंदांचा हा धमाकेदार ट्रेलर एका भयानक सीनने सुरू होतो. रहमानच्या मृत्यूनंतर, लियारीचा राजा बनणारा रणवीर सिंग त्याच्या शत्रूंना हळू हळू कसं संपवेल हे पाहणं रोमांचक ठरणार आहे.

Dhurandhar 2 Trailer
Marathi Director Death: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ हरहुन्नरी दिग्दर्शक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

धुरंधर २ या चित्रपटात रणवीर सिंगसह संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी त्यांच्या भूमिका साकारणार आहेत. धुरंधर हा चित्रपट प्रचंड गाजला प्रेक्षक अजूनही हा चित्रपट आवडीने पाहतात तर या चित्रपटाची गाणी अजूनही ट्रेंडीग आहेत. आता लवकरच येणारा धुरंधर २ प्रेक्षकांना कसा वाटतो हे पाहणे उत्सुकाचे राहिलं.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com