Marathi Director Death: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ हरहुन्नरी दिग्दर्शक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Marathi Director Death: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगावकर यांचे निधन झाले आहे. १९८०-९० च्या दशकात त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करून इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली होती.
Veteran Marathi director Ramesh Salgaonkar passes away
Veteran Marathi director Ramesh Salgaonkar passes away Saam Tv
Published On

Marathi Director Death: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ हरहुन्नरी दिग्दर्शक रमेश साळगावकर यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रमेश साळगावकर यांचे निधन दादर येथील त्यांच्या राहत्या घरी झाले. त्यांच्या पार्थिवावर दादरमधील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह जवळचे मित्र आणि काही सहकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे.

Veteran Marathi director Ramesh Salgaonkar passes away
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घेतली प्रॉपर्टी; राम मंदिराजवळील कोट्यवधींची जमीन केली खरेदी

१९८०-९० च्या दशकात मराठी चित्रपटांना वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये रमेश साळगावकर यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. त्या काळात त्यांनी अनेक लोकप्रिय आणि आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या चित्रपटांमध्ये सामाजिक आशय, कौटुंबिक नातेसंबंध आणि मनोरंजनाचा सुंदर समतोल दिसून येत असे म्हणूनच त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Veteran Marathi director Ramesh Salgaonkar passes away
Social Media Banned: १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बॅन; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

रमेश साळगावकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले. मामला पोरींचा, सत्त्वपरीक्षा, दैवाचे खेळ, चार दिवस सासूचे आणि मधुचंद्राची रात्र यांसारखे चित्रपट त्यांच्या दिग्दर्शनाखाली साकारले गेले. या चित्रपटांनी त्या काळातील प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com