World Cup 2023: वर्ल्डकप विजेत्या टीमवर पैशांचा पाऊस! पराभूत संघही मालामाल होणार; किती असेल बक्षिसांची रक्कम?

ICC ODI World Cup Price Money: विश्वचषकाची ट्रॉफी उंचावणाऱ्या संघावर आयसीसीकडून पैशांचा पाऊस पाडला जाईल.
ICC ODI World Cup Price Money 2023
ICC ODI World Cup Price Money 2023 Saam Tv
Published On

ICC Odi Cricket World 2023 Prize Money:

आज (१९, नोव्हेंबर) आयसीसी वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना. गेल्या एक महिना सुरू असलेल्या विश्वचषकाच्या थराराची या सामन्याने सांगता होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) हे बलाढ्य संघ विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी समोरा- समोर येईल.

विश्वचषकाची ट्रॉफी उंचावणाऱ्या संघावर आयसीसीकडून मोठ्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पराभूत संघही मालामाल होईल. ICC ने संपूर्ण विश्वचषकासाठी किती बक्षीस ठेवले आहे? जाणून घ्या सविस्तर.

विजेत्या, उपविजेत्या संघाला किती मिळणार?

एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या संघाला आयसीसीकडून (ICC) तब्बल ४० लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ३३.१७ कोटी रुपये मिळतील. तसेच उपविजेत्या संघाला २० लाख डॉलर म्हणजेच १६.५८ कोटी दिले जातील. उपांत्य फेरीत खेळणाऱ्या संघाला प्रत्येकी ८० हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे ६.६३ कोटी) मिळणार आहेत.

या स्पर्धेत उपांत्य फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या संघांनाही मोठी रक्कम मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना आठ लाख डॉलर्स (सुमारे 6.63 कोटी रुपये) मिळतील. त्याचबरोबर ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या 6 संघांना प्रत्येकी 1 लाख म्हणजे अंदाजे 82 लाख रुपये मिळतील.

ICC ODI World Cup Price Money 2023
IND vs AUS, World Cup Final: ना धोनी,ना विराट..जे कोणालाच नाही जमलं ते हिटमॅन करुन दाखवणार! WC फायनलमध्ये रचणार इतिहास

२०११ च्या विश्वचषकापेक्षा अधिक रक्कम...

2011 मध्ये, जेव्हा भारताने मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून दुसरा विश्वचषक जिंकला होता. त्यावेळीही आयसीसीने बक्षिसांचा वर्षाव केला होता. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखालील भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी 25 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. जे यावेळच्या बक्षीस रकमेपेक्षा 8 कोटी रुपये कमी आहे. (Latest Marathi News)

ICC ODI World Cup Price Money 2023
Ind vs Aus 2023 Final Toss: 'टॉस द बॉस'! वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडियाने आधी काय करावं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com