Yuvraj Singh Statement: 'धोनी माझा मित्र नव्हताच.. ', युवराज सिंगचा मोठा खुलासा

Yuvraj Singh On MS Dhoni: युवराज सिंगने एमएस धोनीबाबत मोठा खुलासा केला आहे.
Yuvraj singh
Yuvraj singh twitter
Published On

Yuvraj Singh On Friendship With MS Dhoni:

भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग आणि माजी कर्णधार एमएस धोनीच्या मैत्री जगजाहीर आहे. मैदानात असताना दोघे अनेकद मस्ती करताना दिसून आले आहेत. तसेच दोघांनी मिळून भारतीय संघाला महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय देखील मिळवून दिला आहे.

नुकताच त्याने दिलेल्या मुलाखतीत एमएस धोनीसोबतच्या मैत्रीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने स्पष्ट म्हटलं आहे की,मी आणि धोनी कधीच चांगले मित्र नव्हतो.

टीआरएस क्लीपच्या एका चॅट शोमध्ये बोलताना तो म्हणाला की,'धोनी माझा घनिष्ठ मित्र नाही. धोनीची लाईफस्टाईल माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. असं गरजेचं नाही की तुम्ही जर मैदानावर चांगले मित्र असाल तर मैदानाबाहेरही चांगलेच मित्र असाल. धोनीने कधी कधी असे निर्णय घेतले जे मला आवडले नव्हते. त्यामुळे आम्ही कधी चांगले मित्र होऊ शकलो नाही. मात्र मैदानात उतरल्यावर आम्ही दोघांनी देशासाठी १०० टक्के योगदान दिलं. '

'मी आणि धोनी जेव्हा मैदानावर उतरायचो तेव्हा आम्ही मैदानावर १०० टक्के द्यायचो. तो कर्णधार होता आणि मी उपकर्णधार होतो. आमच्यात निर्णयांवरुन नेहमी मतभेद व्हायचे. त्याचे काही निर्णय असायचे जे मला पटायचे नाही आणि माझे असे काही निर्णय असायचे जे त्याला पटायचे नाही. हे प्रत्येक संघासोबत होतं.'असं युवराज सिंग म्हणाला. (Latest sports updates)

Yuvraj singh
Rohit Sharma Record: सिक्स हिटिंग मशिन!! हिटमॅनने मोडला मोठा रेकॉर्ड;असा कारनामा करणारा ठरलाय पहिलाच फलंदाज

तसेच तो पुढे म्हणाला की,' जेव्हा मी माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्यात होतो त्यावेळी मी काय करावं हे मला समजत नव्हतं. तेव्हा मी धोनीकडे सल्ला मागण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी धोनीने मला सांगितलं होतं की, निवडसमिती तुला संघात समाविष्ट करण्याचा विचार करत नाहीये.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'तो आता निवृत्त झाला आहे. मी ही निवृत्त झालो आहे. जेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा चांगले मित्र म्हणून भेटतो. नुकताच आम्ही जाहिरातीच्या शुटिंगसाठी भेटलो होतो. या भेटीत आम्ही जुन्या गोष्टींना उजाळा दिला.

Yuvraj singh
World Cup 2023 Point Table : ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलचं समीकरण बदललं, पाकिस्तानला मिळणार सेमीफायनलचं तिकीट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com