Ind vs Aus 2023 Final Toss: 'टॉस द बॉस'! वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडियाने आधी काय करावं?

Ind vs Aus 2023 Final Toss Prediction: या सामन्यात भारतीय संघासाठी टॉस जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे.
team india
team indiasaam tv news
Published On

India vs Australia, World Cup 2023 Final Toss Prediction:

क्रिकेटमध्ये टॉस अतिशय महत्वाचा ठरतो. सामना कोणता संघ जिंकणार याचा अंदाज अनेकदा टॉस कोणता संघ जिंकला आहे यावरून लावता येतो. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरही असच काहीसं चित्र पाहायला मिळणार आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना याच मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात टॉस जिंकून कोणता निर्णय घेणं योग्य ठरेल? जाणून घ्या. (India vs Australia toss)

टॉस जिंकून काय करावं?

अहमदाबादच्या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यानंतर फिरकी गोलंदाजांचा चेंडू फिरायला लागतो. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. (India vs australia toss result)

या मैदानावर जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने मोठी धावसंख्या उभारली तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला तिथपर्यंत पोहोचणं कठीण होऊन जातं. त्यामुळे जो कोणी संघ टॉस जिंकेल तो फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. (Latest sports updates)

team india
IND vs AUS Weather: वर्ल्डकपच्या हायहोल्टेज सामन्यात पावसाचा खेळ? कसे असेल अहमदाबादचे हवामान अन् खेळपट्टी? वाचा...

फायनलचा दबाव..

हा वर्ल्डकपच्या फायनलचा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांवर दबाव असेल. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने मोठी धावसंख्या उभारली. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघावर दबाव येतो. त्यामुळे कुठलाही संघ टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात असतो. या सामन्यासाठी असेच काहीसे चित्र पाहायला मिळू शकते.

team india
Ind Vs Aus Final: फायनलपूर्वी सारा पोहोचली अहमदाबादला, चाहते म्हणाले, 'गिलचे शतक पक्के'

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

या सामन्यासाठी अशी असू शकते ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:

ट्रेविस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क,अॅडम झाम्पा, जोश हेजलवुड.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com