Ind Vs Aus Final: फायनलपूर्वी सारा पोहोचली अहमदाबादला, चाहते म्हणाले, 'गिलचे शतक पक्के'

Sara Tendulkar News: फायनलपूर्वी सारा पोहोचली अहमदाबादला, चाहते म्हणाले, 'गिलचे शतक पक्के'
Sara Tendulkar-Shubhman Gill
Sara Tendulkar-Shubhman GillSaam TV
Published On

Sara Tendulkar In Ahmedabad:

गुजरातमधील अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत. या सामन्यात मोठ्याने संख्येने क्रिकेट चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीही सहभागी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही अहमदाबादमध्ये पोहोचली आहे. अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी (शनिवारी) सारा तेंडुलकर अहमदाबादमध्ये पोहोचली आहे. तिने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sara Tendulkar-Shubhman Gill
World Cup 2023: 'एका चुकीने...'; रोहित शर्माने फायनलआधीच आपल्याच खेळाडूंना दिला इशारा

याआधीही विश्वचषकातील अनेक सामन्यात साराने लावली हजेरी

भारत-बांगलादेश सामना पाहण्यासाठी सारा तेंडुलकर पुण्यात दाखल झाली होती. त्यानंतर वानखेडेवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहण्यासाठीही ती उपस्थित होती. आता ही चौथी वेळ असेल जेव्हा सचिन तेंडुलकरची मुलगी टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसणार आहे. सारा स्टेडियममध्ये असते तेव्हा कॅमेरामनही तिच्यावर फोकस करतात. (Latest Marathi News)

शुबमन गिलचं शतक पक्के!

सारा तेंडुलकर अहमदाबादमध्ये येताच सोशल मीडियावर शुभमन गिलच्या नावाने चर्चा सुरू झाल्या आहेत. हे दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या नेहमीच चर्चा होतात. असं असलं तरी याबाबत या दोघांनी अद्याप स्वतःहून कोणताही खुलासा केला नाही. मात्र सोशल मीडियावर दोघांच्याही नावाच्या अफवा सुरूच आहेत. यामुळे शनिवारी सारा अहमदाबादमध्ये पोहोचल्याची बातमी येताच सोशल मीडियावर चाहते शुभमनचे उद्या शकत पक्के असल्याचे म्हणत आहेत.

Sara Tendulkar-Shubhman Gill
World Cup Final 2023: 'वर्ल्डकप टीम इंडियाच जिंकणार,पण...' फायनलपूर्वी रवी शास्त्रींचा मोठा दावा

दरम्यान, यापूर्वी जेव्हा जेव्हा सारा स्टेडियममध्ये उपस्थित होती, तेव्हा शुभमन गिलने अर्धशतक झळकावले आहे. या विश्वचषकात त्याच्या नावावर एकूण चार अर्धशतके आहेत. गिलने उपांत्य फेरीत बांगलादेश, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतके झळकावली होती. या तीन सामन्यांमध्ये सारा स्टेडियमवर उपस्थित होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com