World Cup 2023: 'एका चुकीने...'; रोहित शर्माने फायनलआधीच आपल्याच खेळाडूंना दिला इशारा

Rohit sharma News: 'आपल्या एका चुकीने सर्व यशावर पाणी फेरलं जाऊ शकतं, असा इशारा कर्णधार रोहित शर्माने आपल्याच खेळाडूंना दिला आहे.
Rohit sharma
Rohit sharmatwitter
Published On

World Cup 2023:

रोहित शर्मा पहिल्यांदा विश्वचषकात संघाचं नेतृत्व करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. टीम इंडिया उद्या म्हणजे १९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाच्या विरोधात मैदानात उतरणार आहे. उद्या होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधीच रोहित शर्माने आपल्याच खेळाडूंना इशारा दिला आहे.

'मागील १० सामन्यात आपण काय केलं, ते सध्या महत्वाचं नाही. आपल्या एका चुकीने सर्व यशावर पाणी फेरलं जाऊ शकतं, असा इशारा कर्णधार रोहित शर्माने आपल्याच खेळाडूंना दिला आहे. (Latest Marathi News)

विश्वचषकाच्या फायनलआधीच रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'आम्हाला प्रत्येक सामन्यात चांगला खेळ दाखवणं गरजेचं असतं. मागील सामन्याचा विचार करून तुम्हाला पुढे जाता येणार नाही. गेल्या १० सामन्यात आम्ही काय केलं, त्याला आता अर्थ नाही. आता एका चुकीने संपूर्ण यशावर पाणी फेरलं जाऊ शकतं. आम्हाला शांतेत आणि संयमाने सामना खेळावा लागणार आहे, असं रोहित म्हणाला.

Rohit sharma
World Cup Final 2023: 'वर्ल्डकप टीम इंडियाच जिंकणार,पण...' फायनलपूर्वी रवी शास्त्रींचा मोठा दावा

'आता विरोधी संघाच्या कमकुवत बाजूवर लक्ष केंद्रीत करायला हवं. २० वर्षांपूर्वी काय झालं,त्याला आता अर्थ नसल्याचे रोहितने स्पष्ट केले.

तत्पूर्वी, रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेत संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. याविषयी रोहित म्हणाला, 'मी संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. मात्र, इंग्लंडविरुद्ध संघाच्या गरजेनुसार फलंदाजीचं स्वरुप बदललं. आता जलदगतीने फलंदाजी करण्याऐवजी संघाच्या परिस्थितीकडे लक्ष देऊन खेळणार आहे. प्रत्येक खेळाडूंना त्यांच्या भूमिकेविषयी माहिती आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit sharma
Ind vs Aus, World Cup 2023 Final: वर्ल्डकप फायलनपूर्वीच ऑस्ट्रेलियाला भरली हुडहुडी! कर्णधार कमिन्सनं सांगितला मोठा धोका

२ खेळाडूंना मिळाली संघात संधी

रोहित शर्मा प्लेइंग-११ विषयी म्हणाला की,'संघात सर्वच प्रोफेशनल खेळाडू आहेत. सर्वांना माहीत आहे की, खेळात सर्वांना संधी दिली जाऊ शकत नाही. स्पर्धेदरम्यान, हार्दिक पंड्या दुर्दैवाने दुखापतग्रस्त झाला. त्याच्यामुळे मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळालं. याचा अर्थ असा की, कोणाला केव्हाही संधी मिळू शकते. सूर्यकुमारला सिद्ध करण्याची अधिक संधी मिळालेली नाही. पण मोहम्मद शमीला संधी मिळाली, त्याने सिद्धही करून दाखवलं आहे. आता संघातील प्रमुख खेळाडूपैकी एक आहे, असं रोहित म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com