Manasvi Choudhary
उन्हाळ्यात त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे शरीरात घाम येतो यामुळे त्वचा तेलकट व काळी होते.
यावर उपाय म्हणून अनेकजण बाजारातील केमिकलयुक्त उत्पादने वापरतात मात्र याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे त्वचा सुधारेल.
चेहऱ्यावर तेल, घाम काढण्यासाठी दिवसभरात दोन ते तीन वेळा चेहरा स्वच्छ धुवा.
चेहरा धुतल्यानंतर ओपन पोअर्ससाठी तुम्ही टोनर वापरा तुम्ही नैसर्गिक गुलाब पाण्याचा वापर टोनर म्हणून करू शकता.
त्वचा तेलकट असेल तर मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. यामुळे त्वचा मऊ राहते आणि तिचा ओलावा टिकून राहतो.
संपूर्ण दिवसरात जास्तीत जास्तीत पाणी प्या म्हणजे शरीर हायड्रेट राहिल्याने तैलग्रंथींचे कार्य संतुलित राहते.
घरच्या घरी फेस योगा करा कारण त्यामुळे रक्ताभिसरण सुधारून त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते