Pune Accident : सिंहगडावर जाताना घाटात टेम्पोचा अपघात, ५ जणांसह १५० फूट दरीत कोसळला

Pune Accident Latest News Update : पुण्यातील सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर मालवाहू टेम्पो १५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. टेम्पोमधील पाचही जणांनी वेळीच उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Pune Accident
Pune Accident Saam TV Marathi
Published On

Pune Sinhagad ghat accident : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली. ५ जण टेम्पोमधून साहित्य घेऊन जात होते. पण त्यावेळी अवघड वळणावर टेम्पोचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्दैवी घटनेत जीवितहानी झालेली नाही. ३ जण जखमी झाले आहेत, तर २ जण सुखरूप आहेत. टेम्पो दरीत कोसळताना वेळीच सर्वांनी उड्या मारल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर टेम्पोचा चुराडा झाल्याचे फोटो समोर आले आहेत.

सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात

पुण्यातील सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर अपघात झाला. मालवाहू टेम्पो १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरून कोंढणपूर मार्गे सिंहगड -डोणजेकडे टेम्पो येत होता. त्याचवेळी घाटातील एका अवघड वळणावर चालकाचं संतुलन सुटले. त्यामुळे टेम्पो खोल दरीत कोसळला. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलीय.

Pune Accident
टी२० विश्वचषकानंतर राडा; अकोल्यात दगडफेक, सोलापूर-सांगलीत पोलिसांचा लाठीचार्ज, पाहा व्हिडिओ

दैव बलवत्तर म्हणून...

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. टेम्पोमध्ये एकूण ५ जण प्रवास करत होते. यातील ३ जणांना किरकोळ दुखापत झाली असून २ जण सुखरूप आहेत. सर्वांनी वेळीच उडी मारून टेम्पोतून बाहेर पडले, त्यामुळे सर्वजण सुखरूप आहेत. पाचही जणांचे दैव बलवत्तर म्हणून वाचल्याच्या प्रतिक्रिया परिसरातून येत आहेत.

Pune Accident
World Cup 2026 final : फायनलआधी टीम इंडियाचा मोठा निर्णय, २०२३ च्या कटू आठवणीमुळे बदल?

नेमकं झालं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टेम्पोतून लाकडाची वाहतूक केली जात होती. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेची लोखंडी सुरक्षा जाळी तोडून हे वाहन खोल दरीत कोसळले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिंहगड वनविभागाचे परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना खोल दरीतून वर काढत रुग्णवाहिकेतून जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

Pune Accident
घरगुती गॅस सिलिंडर ६० रूपयांनी महागला, सोन्याची किंमत आज वाढली की कमी झाली? वाचा २२k, २४k चे लेटेस्ट दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com