World Cup 2026 final : फायनलआधी टीम इंडियाचा मोठा निर्णय, २०२३ च्या कटू आठवणीमुळे बदल?

India vs New Zealand final : टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने अहमदाबादमधील हॉटेल आणि नरेंद्र मोदी स्टेडियममधील ड्रेसिंग रूममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३ च्या वनडे विश्वचषक फायनलच्या आठवणी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Team India changes dressing room before T20 World Cup final : अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने अहमदाबादमधील हॉटेल आणि स्टेडियममधील ड्रेसिंग रूममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे ‘जिंक्स’ किंवा नकारात्मक इतिहास मोडण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. टी20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी टीम इंडियाने एक वेगळाच निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाची आठवण टाळण्यासाठी भारतीय संघ काही बदल करत असल्याचे समोर आलं आहे. India vs New Zealand T20 World Cup 2026 final

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com