मनोज जयस्वाल
वाशिम : वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलू बाजारच्या उपबाजार समितीतुन ट्रक चालकाने ९ लाख ७८ हजार ६९० रुपयांच्या ३०३ क्विंटल (Washim) गव्हाच्या पोत्यांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात पोलीसांनी (Police) ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)
वाशिमच्या शेलु बाजार येथील उपबाजार समिती (Bajar Samiti) येथे श्री बालाजी ट्रेडर्स नावाने फर्मवर आरोपी रामा पुंडलीक बनसोडे (रा. भोपाळा, ता. नायगाव जि नांदेड) यांचे ट्रकमध्ये ३०३ क्विंटल गहु ज्याची किंमत ९ लाख ७८ हजार ६९० रुपयांचा माल भरला. तो रात्री नऊ वाजताच्या सुमारास श्री बालाजी ट्रेडर्स फार्मवरुन एस.व्ही.एस फुडस प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमीटेड २४८,२४९ सिंगनगुडा गाव मुलगुमंडल समोर मैडचल जि सिद्दीपेठ हैद्राबाद करीता निघाला. २७ नोव्हेंबरला फिर्यादीचा दलाल नामे गणेश कॅन्हाँसिंग (रा. नांदेड) त्याचे मोबाईलवर संपर्क करुन आतापर्यंत ३०३ क्विंटल गहु किंमत ९ लाख ७८ हजार ६९० रुपयांचा माल पोहचला नाही याबाबत विचारणा केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गणेश कॅन्हाँसिंग यांनी मला फोनद्वारे सांगितले की तुमचा माल पोहचला नाही. फिर्यादीने रामा पुंडलिक बनसोडेला मोबाईलवर संपर्क केला. परंतु त्याचा मोबाईल बंद आला. फिर्यादीचे गहु मालाचा रामा बनसोडे यांनी अपहार केल्याचे लक्षात आले. याबाबतच्या तक्रारवरुन पोलीसांनी कलम ४०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय दिनकर राठोड करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.