Rohit Pawar
Rohit PawarSaam tv

Rohit Pawar News : स्वार्थासाठी बाहेर पडलेल्यांकडे आगामी काळात पक्ष नसेल; आमदार रोहित पवार

Washim News : हिंदू- मुस्लिम करण्याचा प्रयत्न, ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न सत्तेच्या लोकांनी केला असल्याचा आरोप देखील त्यांनी व्यक्त केला
Published on

मनोज जयस्वाल 

वाशिम : कितीही चर्चा झाली तरी खरी राष्ट्रवादी ही शरद पवार साहेबांकडेच राहणार. जे लोक स्वार्थासाठी व स्वतःच्या हितासाठी (NCP) सत्तेत जावून बसले आहेत. त्यांची भाषा बदलेली आहे. ती कशी बदलली हे आपण सर्वांनी बघितलं आहे. त्यामुळं येत्या काळात त्यांच्याकडे पक्ष नसणार; असे मत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. (Breaking Marathi News)

Rohit Pawar
Milk Price: येवल्यात मुख्यमंत्री, उपमुख्यत्र्यांचा फोटोला दुग्धाभिषेक; धाराशिवमध्ये रस्त्यावर ओतले दूध

आमदार  रोहित पवार यांची युवा संघर्ष संवाद यात्रा (Washim) वाशिममध्ये दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर होत असलेल्या सुनावणीबाबत आपली प्रतिक्रिया मांडली, तसेच  भाजपवर निशाणा साधताना द्वेषाचं राजकारण भाजपकडून केलं जाते. हिंदू- मुस्लिम करण्याचा प्रयत्न, ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न सत्तेच्या लोकांनी केला असल्याचा आरोप देखील त्यांनी व्यक्त केला. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit Pawar
Unseasonal Rain : अवकाळीचा फटका; नंदुरबार जिल्ह्यात ३ हजार हेकटरवरील पिकांचे नुकसान

बीडमधील जाळपोळमध्ये सत्तेतील व्यक्तीचा हात 

बीडमध्ये जी जाळपोड झाली त्याच्या मागे एका शक्तिशाली व्यक्तीचा हात होता. सत्तेत असलेल्या व्यक्तीचा हात होता. सात तास जाळपोळ सुरू होती, तेव्हा पोलीस शांत बसले होते. पोलीस केव्हा शांत बसतात जेव्हा सत्तेतला व्यक्ती आदेश करतो तेव्हा ते शांत बसतात. अशा प्रकारे तिथे जाळपोळ करत मराठा ओबीसी समाजामध्ये गढून करण्याचा प्रयत्न झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com