Unseasonal Rain : अवकाळीचा फटका; नंदुरबार जिल्ह्यात ३ हजार हेकटरवरील पिकांचे नुकसान

Nandurbar News : नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे सुरू झाल्यावर नुकसानीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने व्यक्त केला गेला आहे
Nandurbar Unseasonal Rain
Nandurbar Unseasonal RainSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदूरबार
: नंदुरबार जिल्ह्यात सलगदोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. (Nandurbar) यात कृषी विभागाने दिलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार जिल्ह्यात सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील (Rain) पिकांना याचा फटका बसलेला आहे. (Tajya Batmya)

Nandurbar Unseasonal Rain
Amalner News : जेवणासाठी बोलवायला गेले असता बसला धक्का; पत्नी गावी गेली असताना वृद्धाने संपविले जीवन

राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. आणखी पुढील एक- दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अगोदरच दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Shahada) शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. साधारण ३ हजार हेक्टरवर नुकसानीचा अंदाज आहे. परंतु या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे सुरू झाल्यावर नुकसानीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने व्यक्त केला गेला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar Unseasonal Rain
Milk Price: येवल्यात मुख्यमंत्री, उपमुख्यत्र्यांचा फोटोला दुग्धाभिषेक; धाराशिवमध्ये रस्त्यावर ओतले दूध

पंचनाम्यांना सुरवात 

नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक अकराशे हेक्टर क्षेत्र शहादा तालुक्यातील आहे. प्रशासनाच्यावतीने पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली असली तरी लवकर पंचनामे करण्याची मागणी (Farmer) शेतकऱ्यांनी केले आहे. तर दुसरीकडे नुकसान झालेल्या पिकांपेक्षा सर्वाधिक मोठा फटका रब्बी हंगामात पेरणी केलेल्या गहू आणि हरभऱ्यांना बसल्याचे चित्र आहे. अनेक शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने त्या ठिकाणी दुबार पेरणीची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com