Cotton Theft
Cotton TheftSaam tv

Cotton Theft: शेतातील गोडाऊनमधून ३५ क्विंटल कापसाची चोरी; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Nandurbar News : एकीकडे नैसर्गिक संकटाने संकटात सापडलेला शेतकरी आता चोरट्यांच्या वक्र नजरेमुळे दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र
Published on

सागर निकवाडे 
नंदुरबार
: अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती यांच्याशी संघर्ष करत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतून कापूस पिकवला होता. मात्र आता या (Cotton) कापसावर चोरट्याने आपली नजर फिरवली आहे. यात शेतातून (Nandurbar) वेचणी करून काढलेला कापूस शेतात असलेल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवला होता. हा कापूस चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. (Latest Marathi News)

Cotton Theft
Bullock Cart Race : बुधगावच्या बैलगाडी शर्यत आयोजकांवर गुन्हे दाखल

पावसाच्या लहरीपणामुळे यंदा अपेक्षित उत्पादन शेतकऱ्याला मिळाले नाही. शिवाय कापसाला देखील चांगला भाव नाही. तर आता (Theft) झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे एकेमागून एक संकट येत असताना शेतातून काढून ठेवलेला कापसावर चोरट्यांनी नजर पडली आहे. यामुळे शेतकरी (Farmer) अधिकच चिंतेत पडला आहे. असाच प्रकार शहादा तालुक्यातील मंदाना येथे कापूस चोरीला गेल्याच्या प्रकारावरून समोर आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cotton Theft
Nashik Crime News : जुन्या भांडणातून मुलाचे अपहरण; टोळक्याने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

शहादा तालुक्यातील मंदाना येथील विजय राजपूत या शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकवलेला 50 क्विंटल कापूस शेतातील गोडाऊन मध्ये ठेवला होता मात्र चोरट्यांनी त्यातील जवळपास ३५ क्विंटल कापूस लांबवीला आहे. चोरट्यांनी लंपास केलेल्या कापसाची किंमत जवळपास अडीच लाखाच्या आसपास आहे शेत शिवारातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभारलेले आहेत. एकीकडे नैसर्गिक संकटाने संकटात सापडलेला शेतकरी आता चोरट्यांच्या वक्र नजरेमुळे दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com