Bullock Cart Race : बुधगावच्या बैलगाडी शर्यत आयोजकांवर गुन्हे दाखल

पाेलीसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

sangli police charged bullock cart race organizers for violating rules
sangli police charged bullock cart race organizers for violating rulesSaam TV
Published On

Sangli Crime News :

शासनाच्या नियमांचे पालन न केल्याने सांगली जिल्ह्यात बैलगाडी शर्यत आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार बुधगाव येथे बैलगाडी स्पर्धा भरविण्यात आली हाेती. या स्पर्धेदरम्यान आयाेजकांनी पाेलीसांच्या नियमांचे पालन केले नसल्याचे समाेर आले. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बुधगव येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले हाेते. कवलापूर ते बुधगाव रस्त्यावर वरील सर्व आयोजकांकडून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.


sangli police charged bullock cart race organizers for violating rules
Mla Sangram Jagtap: आमदार संग्राम जगताप मंगळवारी बसणार उपाेषणास, प्रशासनास दिला इशारा; जाणून घ्या कारण

या बैलगाडी शर्यतीमध्ये पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे तसेच शासनाने लागू केलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार अमोल उत्तम पाटील, वैभव शामराव पाटील, सागर पाटील (सर्व रा. बिसूर), विशाल हाक्के, राजेश पाटील, संपत हाक्के (सर्व रा. कवलापूर, ता. मिरज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar


sangli police charged bullock cart race organizers for violating rules
Unseasonal Rain Hits Nashik: ७२ तासांच्या आत संपर्क साधा, नुकसानग्रस्त भागातील शेतक-यांना कृषी विभागाचे आवाहन; जाणून घ्या टोल फ्री क्रमांक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com