- तबरेज शेख
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तसेच गारपीट देखील झाल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. चांदवड, निफाड या ठिकाणी कांदा आणि द्राक्ष पिकांचे (unseasonal rain hits onion and grapes farm in nashik) क्षेत्र असेलल्या भागात जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी तातडीने ७२ तासांच्या आत टोल फ्री क्रमांकावर अथवा लेखी स्वरुपात कृषी विभागास कळवावे असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. (Maharashtra News)
जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी साम टीव्हीला दिलेल्या माहितीनूसार द्राक्ष बाग हे मणी भरण्याच्या अवस्थेत असतानाच त्याचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज प्राप्त झाल्यावर शासनाला कळवला जाणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्याचप्रमाणे आजपासूनच जिल्ह्यात पंचनामे करण्याचे आदेश देखील देण्यात आल्याचे साेनवणे यांनी नमूद केले. आदिवासी भागात देखील कापणीला आलेले भात पीक आणि काढून ठेवलेले भात पीक याचे नुकसान झाले असेही साेनवणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी तातडीने ७२ तासांच्या आत 1800118485 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. तसेच ज्या ठिकाणी नेटवर्क अडचण आहे, त्यांनी लेखी स्वरूपात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.