Rohit Pawar Nitesh Pawar
Rohit Pawar Nitesh PawarSaam tv

Rohit Pawar News: कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलतात: रोहित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा 

Parbhani News : नितेश राणे माझे चांगले मित्र आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी फालतू राजकारण करू नये
Published on

परभणी : नितेश राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांनी मोदी साहेबांचा एक फोटो ट्विट केला होता. त्यामध्ये मोदी साहेब जुगार खेळणाऱ्यांबरोबर होते. आणि आता ते शरद पवार साहेबांचा फोटो आरोपी सोबतचा ट्विट करून हा मुद्दा पुढे करत आहेत. त्यांनी कपडे बदलले तसे पक्ष बदलले आहेत विचार बदलले आहेत; अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maharashtra News)

Rohit Pawar Nitesh Pawar
Sambhajinagar News : चाऱ्याअभावी निम्‍या किमतीत जनावरे विक्री; पाचोडच्या आठवडे बाजारातील चित्र

नितेश राणे यांनी शरद पवार यांचा ट्विट केलेल्या फोटोबाबत आपली प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे कि, नितेश राणे हे कपडे बदलले तसे पक्ष बदलतात, इतके पक्ष बदलल्यानंतर त्यांच्याकडे स्वाभिमान राहिला आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit Pawar Nitesh Pawar
Dhule News : विजांच्या गडगडासह पावसाची जोरदार हजेरी; पिकांचे नुकसान 

राणेंनी फालतू राजकारण करू नये 

नितेश राणे यांना मराठी माणसाची अस्मिता काय कळणार. नितेश राणे माझे चांगले मित्र आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी फालतू राजकारण करू नये. डिसेंबरपर्यंत तुम्ही मंत्री झाला, तर पहा कारण त्यानंतर सरकार राहील की नाही अशी टीका रोहित पवार यांनी नितीश राणीने केलेल्या ट्विट वरून केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com