Sambhajinagar News : चाऱ्याअभावी निम्‍या किमतीत जनावरे विक्री; पाचोडच्या आठवडे बाजारातील चित्र

Sambhajinagar News : महाग असल्याने जनावरांना खाऊ घालणे पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : अपेक्षित पाऊस झाला नसल्याने सर्वत्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. यात मराठवाड्यामध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे सध्या (Farmer) शेतकरी पशुपालक देखील मोठ्या चिंतेत सापडले आहेत. (Sabhajinagar) पशुधन कसे जगवावे ही चिंता त्यांना सतावत असून चाऱ्याअभावी जनावरे निम्म्या किंमत मध्ये विकायची वेळ आली आहे. (Breaking Marathi News)

Sambhajinagar News
Nandurbar News : काही भाग दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने शिवसेना आक्रमक; रस्त्यावर उतरण्याच्या दिला इशारा

छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....'या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत आहे. पाण्याअभावी चारा मिळेनासा झाला आहे, जो काही चारा आहे, तो महाग असल्याने जनावरांना खाऊ घालणे पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यामुळे आता चार खरेदी करून जनावरांचे पालन करावे आपला घरखर्च भागवावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar News
Shahapur News : सरसकट कुणबी प्रणमपात्र देऊ नये; ओबीसींच्या न्यायासाठी बेमुदत उपोषण

मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता, शासनाने चारा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणी होत आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना त्यांची  दुभती जनावरे शेतकऱ्याला कवडीमोल भावात विकायची वेळ आली आहे. पाचोडच्या आठवडी बाजारात हे चित्र पहावयास मिळत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com