Fire: इंदुरनंतर दिल्लीत अग्नितांडव, ३ चिमुकल्यांसह १७ जणांचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Delhi And Indore Fire: दिल्ली आणि इंदुरमध्ये भीषण आगीच्या घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. पहाटे गाढ झोपेत असताना ही आग लागली. या आगीत १७ जण जिवंत जळाले. मृतांमध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे.
Fire: इंदुरनंतर दिल्लीत अग्नितांडव, ३ चिमुकल्यांसह १७ जणांचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?
Delhi And Indore FireSaam Tv
Published On

Summary -

  • इंदूर आणि दिल्लीमध्ये भीषण आगीच्या दुर्घटना घडल्या

  • दोन्ही घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू

  • इलेक्ट्रिक कार चार्जिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग

  • मृतांमध्ये ३ लहान मुलांचा समावेश

इंदुर आणि दिल्लीमध्ये बुधवारी सकाळी आगीच्या भयंकर घटना घडल्या. इंदुरमध्ये घर आणि दिल्लीमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये ३ लहान मुलांचे देखील समावेश आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही घटनामध्ये आग नेमकी कशी लागली यामागचे कारण समोर आले आहे.

इंदुरमध्ये बंगाली चौराहे परिसरात असलेल्या एका कॉलनीमध्ये बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. एका घराबाहेर उभ्या केलेल्या इलेक्ट्रीक कारला चार्जिंग करत असताना शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली. कारला लागलेल्या आगीने भयंकर रुप धारण करून ही आग संपूर्ण घराला लागली. या आगीमध्ये होरपळून घरातील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. या आगीमध्ये ३ जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Fire: इंदुरनंतर दिल्लीत अग्नितांडव, ३ चिमुकल्यांसह १७ जणांचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?
Ambernath MIDC Fire: अंबरनाथ MIDC मध्ये भीषण आग; ३ ते ४ कंपन्या आगीच्या विळख्यात, आकाशात पसरले धुरांचे लोट

पुगलिया कुटुबीयांच्या घराबाहेर मध्यरात्री इलेक्ट्रीक कार चार्जिंगला लावून ठेवली होती. पहाटे ४ वाजता चार्जिंग पॉइंटमध्ये शॉर्ट सर्किट झाला त्यामुळे कारला आग लागली. आग वाढत गेली आणि संपूर्ण घरात पसरली. घराच्या आतमध्ये ठेवलेल्या ४ गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. एकएक कर चारही सिलिंडर फुटले. त्यामुळे घराचा काहीभाग कोसळला. या आगीमुळे घरामध्ये असलेल्यांना बाहेर पडता आले नाही आणि ते आगीमध्ये जिवंत जळाले. पुगलिया यांच्या घरामध्ये कार्यक्रम असल्यामुळे नातेवाई देखील त्यांच्या घरीच थांबले होते. या आगीमध्ये ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Fire: इंदुरनंतर दिल्लीत अग्नितांडव, ३ चिमुकल्यांसह १७ जणांचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?
Nagpur Fire : नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अग्नितांडव, काल १७ जणांचा मृत्यू, आज भयंकर आग

तर दुसरीकडे दिल्लीमध्ये बुधवारी सकाळी ४ मजली इमारतीला भीषण आग लागली. दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम जिल्ह्यातील पालम भागात ही घटना घडली. साध नगरमधील एका इमारतीला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या कपडे आणि कॉस्मेटिकच्या दुकानात आग लागली. हळूहळू ही आग वरच्या मजल्यावर पसरत गेली. आग इतकी भयंकर होती ही आगीमध्ये ९ जण जिवंत जळाले. मृतांमध्ये ३ लहान मुलांचा देखील समावेश आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आगीने संपूर्ण इमारतीला वेढा घातला आहे. आग लागल्यामुळे इमारतीवरून काही जणांनी जीव वाचवण्यासाठी खाली उड्या मारल्या. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Fire: इंदुरनंतर दिल्लीत अग्नितांडव, ३ चिमुकल्यांसह १७ जणांचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?
Fire Accident : अग्निकांड! कार चार्जिंगवेळी शॉर्ट सर्किट, ४ सिलिंडरचा स्फोट, ७ जणांच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com