Nagpur Fire : नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अग्नितांडव, काल १७ जणांचा मृत्यू, आज भयंकर आग

Nagpur fire incident : नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भीषण आग लागल्याने खळबळ उडाली आहे. कालच्या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज नरसाळा परिसरात सिंथेटिक पाईप्स जळून मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
Nagpur fire incident
Nagpur fire incidentSaam TV
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur second day fire incident details : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी एसबीएल कंपनीमध्ये विस्फोटामुळे आगीचा भडका उडाला होता. त्या दुर्दैवी घटनेत १७ जणांना आपले प्राण गमावावे लागले होते. या दुर्घटनेमुळे शहरात शोककळा असतानाच आज पुन्हा एकदा भयंकर आगीची घटना घडली. नरसाळा येथील चाणक्यापूरमध्ये सिंथेटिक पाईपला अचानक आग लागली. यामध्ये ५०० पाईप जळून खाक झाली. सुदैवाने आजूबाजूच्या घरात पोहचण्याआधी आग नियंत्रणात आणली गेली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

नागपूरमधील नरसाळा भागातील चाणक्यपूरम परिसरात भीषण आगीची ही दुर्दैवी घटना घडली. पाण्याच्या टाकीखाली साठवून ठेवलेल्या तब्बल १,७०० सिंथेटिक पाईप्सपैकी ७०० पाईप्स या आगीत जळून खाक झाले. या घटनेमुळे परिसरात सुमारे अर्धा ते एक तास धुराचे लोट होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Nagpur fire incident
Dubai attack : महायुद्ध भडकलं! दुबईतल्या हल्ल्यात भारतीय नागरिक जखमी | VIDEO

नरसाळा परिसरात गटारलाइनच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात सिंथेटिक पाईप्स आणून ठेवण्यात आले होते. या पाईप्सच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतील कचऱ्याला अचानक आग लागली. ही आग पसरत जाऊन पाईप्सपर्यंत पोहोचली. पाईप्सवर रबरचे आवरण असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले. हे दृश्य पाहून बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली होती.

Nagpur fire incident
मॅच विनिंग ९७ धावा करताच संजूनं घेतलं विराट-रोहितचं नाव, शेवटच्या क्षणापर्यंत डोक्यात काय चाललं होतं?

स्थानिकांनी या आगाची तात्काळ माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच १५-२० मिनिटांत फायर ब्रिगेडच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. वेळेवर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्यामुळे ही आग शेजारील घरांपर्यंत पोहोचली नाही, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.

Nagpur fire incident
US Iran war : इराणच्या ४८ नेत्यांना एकाच वेळी मारले, डोनाल्ड ट्रम्प यांनी कारणही सांगितले

या आगीत ७०० पाईप्स जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग आपोआप लागली की काही समाजविघातकांनी जाणूनबुजून लावली, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. मोकळ्या जागेत टाकलेला कचरा या आगीसाठी कारणीभूत ठरल्याने प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत काय पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Nagpur fire incident
Monday Horoscope : सोमवारी 'या' ४ राशींचे नशीब पालटणार; मेष ते मीन, कोणाला मिळणार गूड न्यूज, वाचा राशीभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com