मॅच विनिंग ९७ धावा करताच संजूनं घेतलं विराट-रोहितचं नाव, शेवटच्या क्षणापर्यंत डोक्यात काय चाललं होतं?

Sanju Samson T20 records Latest Marathi news : संजू सॅमसनने ९७ धावांची मॅच विनिंग खेळी करत भारताला उपांत्य फेरीत पोहोचवले. या ऐतिहासिक खेळीनंतर त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माकडून शिकलेल्या गोष्टींचा उल्लेख करत धावांचा पाठलाग करताना डोक्यात काय सुरू होते, याचा खुलासा केला.
Sanju Samson T20 records Latest Marathi news
Sanju Samson T20 records Latest Marathi newsBCCI
Published On

Sanju Samson, T20 World Cup : संजू सॅमसन यानं नाबाद ९७ धावांची विस्फोटक फलंदाजी करत भारताला सेमी फायनलचे तिकिट मिळवून दिलेय. वेस्ट इंडिजने दिलेले १९६ धावांचे आव्हान भारताने संजूच्या वादळी फलंदाजीच्या बळावर ५ विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. संजू सॅमसन याने ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने त्याने विजयी खेळी केली. संजू सॅमसन याने या ९७ धावांच्या खेळीसह विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडलाय. टी२० विश्वचषकात धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठी खेळी विराट कोहलीच्या नावावर होती. विराट कोहलीचा ८२ धावांची खेळीचा विक्रम मोडीत काढलाय. ९७ धावांच्या खेळीनंतर संजू सॅमसन याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी बोलताना संजू सॅमसन यानं माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा खास उल्लेख केला. त्याशिवाय धावांचा पाठलाग करताना डोक्यात नेमकं काय सुरू होतं? हे सांगितले.

संजू सॅमसन नेमकं काय म्हणाला ?

ही खेळी माझ्यासाठी सर्वस्व आहे. ज्या दिवसापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली, देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले, तेव्हापासून मी याच खेळीची प्रतीक्षा करत होतो. माझा प्रवास खूप खास राहिला आहे. यात अनेक चढ-उतार आले. मी स्वतःवरच शंका घ्यायचो की, मी इथपर्यंत पोहोचू शकेन का? पण आज मला हा आशीर्वाद दिल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे, असे संजू सॅमसन निघाला. ()

Sanju Samson T20 records Latest Marathi news
मुंबईत मिळणार फायनलचे तिकिट; उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मी अनेक वर्षांपासून हा फॉरमॅट खेळतोय. मी कोहली, रोहित शर्मा आणि एम.एस. धोनी सारख्या महान खेळाडूंकडून खूप काही शिकलो आहे. त्यांच्या अनुभवाचा मला फायदा झाला. हे दिग्गज खेळाडू परिस्थितीनुसार आपला खेळ कसा बदलतात, हे मी जवळून पाहिले आहे. मागच्या सामन्यात आम्ही प्रथम फलंदाजी करत होतो, त्यामुळे मी पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळत होतो. पण या सामन्यात परिस्थिती वेगळी होती. जेव्हा जेव्हा मी जास्त जोखीम घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही विकेट्स गमावल्या. मला वाटलं नव्हतं की मी अशी विशेष खेळी खेळेन, पण हो, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. मी फक्त वर्तमानात राहिलो आणि चेंडूच्या गुणवत्तेनुसार (merit) खेळलो, असे संजू सॅमसन म्हणाला.

Sanju Samson T20 records Latest Marathi news
Nagpur Blast : स्फोटाने नागपूर हादरले, १७ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

सूर्यकुमार यादव नेमकं काय म्हणाला? Suryakumar Yadav captain reaction

संजू सॅमसनच्या मॅच विनिंग खेळीचं कर्णधार सूर्यकुमार यादव यानं कौतुक केले. तो म्हणाला की, जे लोक संयम ठेवतात आणि चांगल्या संधीची वाट पाहतात, त्यांच्यासोबत चांगल्याच गोष्टी घडतात, असे मी नेहमीच म्हणत आलो आहे. संजूने पडद्यामागे (जेव्हा तो खेळत नव्हता तेव्हा) जेवढी मेहनत घेतली आहे, त्याचे फळ त्याला अगदी योग्य वेळी मिळाले आहे.

Sanju Samson T20 records Latest Marathi news
Nagpur Blast : स्फोटाने नागपूर हादरले, १७ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com