Dubai attack : महायुद्ध भडकलं! दुबईतल्या हल्ल्यात भारतीय नागरिक जखमी | VIDEO

Indian injured in Dubai attack latest update : दुबईत झालेल्या हल्ल्यात एक भारतीय नागरिक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय दूतावासाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून बुर्ज खलिफा सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.

Dubai attack Indian injured : इराणने दुबईत केलेल्या हल्ल्यात एक भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती युएईतील भारतीय दूतावासाने ट्विट करत दिली आहे... या जखमी भारतीय नागरिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दुतावासातील अधिकारी संपर्कात असून सर्वतोपरी मदत केली जात आहे...

इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात एक भारतीय नागरिक गंभीररीत्या जखमी झाला असल्याची माहिती संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) भारतीय दूतावासाने दिली आहे. दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वरून या घटनेची पुष्टी केली आहे. जखमी भारतीय नागरिकाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारतीय दूतावासातील अधिकारी सातत्याने जखमी व्यक्तीच्या आणि रुग्णालयाच्या संपर्कात आहेत. त्यांना सर्वतोपरी मदत पुरवण्यासाठी दूतावास प्रयत्नशील असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, इराणने दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफावर हल्ला केल्याच्या चर्चांना दूतावासाने पूर्णविराम दिला आहे. बुर्ज खलिफा सुरक्षित असून, हा हल्ला शहरातील इतर भागात झाला असल्याची स्पष्टोक्ती देण्यात आली आहे. या घटनेमुळे दुबईतील भारतीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण असले, तरी दूतावासाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com